
सिन्नर । वार्ताहर | Sinnar
तालुक्यातील देवपूर (devpur) येथील लोकशिक्षण मंडळाच्या (Board of Public Education) एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी (students) कवायतीच्या माध्यमातून पणतीदिव्याचा आकार साकारत नववर्षाचे स्वागत केले.
संपू दे अंधार सारा...समाजातील अंधकार नाहीसा होऊन पणतीच्या दिव्याच्या तेजाने आयुष्याची वाट पुन्हा एकदा उजळून निघावी, असा संदेश या कवायतीच्या माध्यमातून देत विद्यार्थ्यांनी (students) नववर्षाचे (new year) स्वागत केले. एनडीएसटी सोसायटीचे संचालक दत्तात्रय आदिक (Dattatraya Adik, Director, NDST Society) यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी ज्योत असलेल्या पणतीसह कवायत केली.
यासाठी मुख्याध्यापक संजय जाधव, क्रीडाशिक्षक शंकर गुरुळे, वैशाली पाटील, सुनीता शिंदे, रवींद्र कोकाटे, सुवर्णा मोगल, दत्तात्रय धरम, सुनील पगार, रामेश्वर मोगल, नानासाहेब खुळे, रवी गडाख, नारायण भालेराव, अशोक कळंबे यांनी परिश्रम घेतले.