
त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar
येथील आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा (Student) गगनगिरी आश्रमाजवळ मांजाच्या दोऱ्याने गळा (Throat) चिरल्याची घटना घडली आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, केदार सुधीर वाघ असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो शाळेतून सायकलवरून घरी जात असतांना नायलॉन मांजा (Nylon Manja) त्याच्या गळ्यात अडकल्याने गंभीर जखमी झाला. यावेळी त्याच्या गळ्यासह पाय व हाताच्या अंगठ्याला दुखापत (injury) झाल्याने टाके घालावे लागले आहेत.
दरम्यान, त्र्यंबकेश्वरला भाविकांची (Devotees) सतत वर्दळ असल्याने मोठा अनर्थ घडू शकतो. त्यामुळे त्र्यंबक नगरपरिषद (Trimbak Municipal Council) आणि पोलिसांनी (Police) लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच शहरात सर्रास नायलॉन मांजाची विक्री होत असून प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे वाघ यांनी सांगितले.