नाशिकच्या विद्यार्थ्यांचे जिम्नॅस्टिक स्पर्धेत यश

नाशिकच्या विद्यार्थ्यांचे जिम्नॅस्टिक स्पर्धेत यश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ऐरोली येथील युरो स्कूलने (CISCE) प्रादेशिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत अशोका युनिव्हर्सल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी विविध सहभाग नोंदवत अनेक पारितोषिके पटकावली...

अनेक शाळांतील खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत अशोकाच्या रुद्र सोमवंशी याला रौप्य आणि कांस्य पदकाने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय पातळीवर त्याची निवड करण्यात आली आहे.

श्याम पगार यानेही सुवर्ण व रोप्य पदक मिळवून यश संपादन केले. आदित्य कोरडे याने रौप्य पदक मिळवून यश संपादन केले. तसेच अशोकाच्या संघानेही 'द्वितीय चॅम्पियनशिप पुरस्कार' मिळवून शाळेला घवघवीत यश मिळवून दिले.

या विद्यार्थ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण सरावामुळे हे ध्येय गाठण्यास त्यांना मदत झाली, त्याचबरोबर त्यांचे मार्गदर्शक कौस्तुभ सोनवणे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com