विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासावर लक्ष द्यावे : प्रा. शिंदे

विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासावर लक्ष द्यावे : प्रा. शिंदे

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी Pimpalgaon

विद्यार्थ्यांनी (students) तांत्रिक (Technical), व्यवसायिक कौशल्या (Business skills) बरोबरच व्यक्तिमत्व विकासावर (Personality development) ही लक्ष दिले पाहिजे. स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान (Technology) आत्मसात करून स्वतःला अद्ययावत ठेवले पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.दिलीप शिंदे (Principal Dr. Dilip Shinde) यांनी केले आहे.

मविप्र (MVP) संस्थेच्या पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात (Karmaveer Kakasaheb Wagh College of Arts, Science and Commerce) प्रथम वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान आणि संगणक विज्ञान वर्गाच्या तीन दिवसीय दिक्षारंभ समारंभ (Induction program) मध्ये डॉ.शिंदे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. सुनील आहिरे, उपप्राचार्य प्रा. ज्ञानोबा ढगे, अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे प्रमुख प्रा.भगवान कडलक, प्रा.साहेबराव मोरे, परीक्षा अधिकारी प्रा.नामदेव गावित, क्रीडा अधिकारी प्रा.हेमंत पाटील, ग्रंथपाल, विद्यार्थी विकास प्रमुख प्रा.डॉ.ज्ञानेश्वर सातभाई, एनसीसी प्रमुख डॉ.उपेंद्र पठाडे, अमोल मेहेंदळे, प्रा.डॉ.नरेंद्र पाटील उपस्थित होते.

बारावी नंतरच्या उच्च शिक्षणाची रचना (structure of education) तसेच विद्यापीठ अनुदान आयोग (University Grants Commission), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) आणि मविप्र संस्था यांच्यामार्फत आयोजित केले जाणारे विविध उपक्रम यांची माहिती नव्याने पदवी वर्गात प्रवेश करणार्‍या बी.ए., बी.कॉम. बी.एस्सी. वर्गात प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांसाठी या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ.दिलीप शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात राबविण्यात येणार्‍या विविध अभ्यासक्रमाची माहिती दिली. तसेच भविष्यातील करियर च्या संदर्भातील विविध संधी बाबत जागरूकता केली.

महाविद्यालयातील विद्यार्थी विकास मंडळ (Student Development Board), राष्ट्रीय सेवा योजना (National Service Plan), क्रीडा विभाग (Sports Department), राष्ट्रीय छात्र सेना, कला सांस्कृतिक मंडळ, विविध सर्टिफिकेट कोर्सेस यांची माहिती संबंधित विभागाच्या विभागप्रमुखांनी दिली. कोविड 19 च्या नियमांचे पालन करीत तीन दिवस दिक्षारंभ संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रा.राजेश निकम, प्रा.प्रवीण ढेपले, प्रा.नारायण शिंदे, प्रा.चित्रलेखा जोंधळे, प्रा.पवनजेय सुदेवाड, प्रा.डॉ.संतोष दळवी, प्रा.बी.के. आहेर, प्रा.कुंदे, प्रा.सचिन कुशारे, प्रा.शांताराम वळवी यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com