विद्यार्थ्यांनी अध्ययनात शिस्त बाळगावी: मविप्र संचालक गडाख

विद्यार्थ्यांनी अध्ययनात शिस्त  बाळगावी: मविप्र संचालक गडाख

खेरवाडी । वार्ताहर | Kherwadi

सध्याचे स्पर्धेचे युग आहे, नोकर्‍या (job) मिळविण्यासाठी शिक्षण क्षेत्रात (education sector) देखील प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे.

विद्यार्थ्यांचे (students) भवितव्य उज्वल होण्यासाठी त्यांनी अध्यायना बरोबरच शिस्तीला प्राधान्य दिले पाहिजे असे प्रतिपादन मविप्र संचालक शिवाजी गडाख (MVP Director Shivaji Gadakh) यांनी केले आहे.

चांदोरी (chacdori) येथील के.के. वाघ आयोजित पालक मेळाव्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना गडाख बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर के.के. वाघ संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य सुरेश भोज, माणिक गायखे, पत्रकार राजेंद्र आहेर, दिलीप कदम, उपसरपंच बापू गडाख, प्रा.डॉ.आर.के. दातीर, उपप्राचार्य डॉ.एस. जी. सावंत, प्रा.पी.पी. आहेर आदी उपस्थित होते.

यावेळी प्राचार्य दातीर म्हणाले चोवीस तासातील फक्त चार तास विद्यार्थी (students) शिक्षकांच्या (teachers) सानिध्यात असतो, त्याचा सर्वांगीण विकास घडविण्याच्या दृष्टीने पालकांची भूमिका देखील महत्त्वाची आहे. तसेच आमची संस्था शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकतेची पाईक आहे असे मनोगत व्यक्त करून नवीन अभ्यासक्रम सीबीएससी (CBSC) व विद्यार्थ्यांची मानसिक व शारीरिक गुणवत्ता वाढीसाठी महाविद्यालयाने सुरू केलेल्या नवनवीन उपक्रमांविषयी माहिती दिली.

वतीने राजेंद्र आहेर, दिलीप निकम यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित पालकांनीही उच्च विद्याविभूषित प्राध्यापकांचे उत्कृष्ट अध्यापन व पालकांचे केलेले समुपदेशन तसेच प्रशस्त इमारत, अद्यावत जिमखाना, ग्रंथालय, वाचन कक्ष, भव्य क्रीडा मैदान, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा व विशेषत: शिक्षकांची विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष या सर्व बाबींमुळे आम्ही पालक समाधानी आहोत.

तसेच येणार्‍या राष्ट्रीय मूल्यमापन व मूल्यांकन समितीच्या प्रश्नांना निपक्षपातीपणे व योग्य उत्तरे देण्यास आम्ही पालक कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन केले. प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ.सावंत, सुरेश भोज यांनी, सूत्रसंचालन प्राध्यापक खैरनार यांनी तर प्रा.पी.पी. आहेर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रा.आर.बी. पोटे आदींसह शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com