विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संकल्प

विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संकल्प

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

येथील एस. जी. पब्लिक स्कूलच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी (students) पर्यावरणपूरक दिवाळी (Eco friendly Diwali) साजरी करण्याचा संकल्प करत शाळेत (School) दिवाळी साजरी केली.

अध्यक्षस्थानी संस्थेचे सेक्रेटरी राजेश गडाख होते. दोडी येथील सेवानिवृत्त लिपिक पांडुरंग विंचू, दातली हायस्कूलचे सांगळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्याध्यापक उदय कुदळे, बापू चतुर, जिजा ताडगे, कविता पद्मा गडाख यांनी उपक्रमाचे नियोजन केले.

विद्यार्थ्यांना (students) भारतीय संस्कृतीची (Indian culture) ओळख व्हावी या उद्देशाने वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्थी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, भाऊबीज हे पाचही सण (festival) यावेळी साजरे करण्यात आले. सण साजरे करताना वैज्ञानिक दृष्टिकोनातून (Scientific approach) बघावा.

भारतीय संस्कृती, परंपरा जोपासल्या जाव्यात, असे आवाहन गडाख यांनी केले. विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक (Environmentally friendly), फटाकेविरहित दीपावली (Diwali without crackers) साजरी करण्याचा देण्यात आला. यावेळी टाकाऊतून टिकाऊ आकाशकंदिल व भेटकार्ड बनवणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

कंदिल व भेटकार्डवर विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी (Pollution Free Diwali), आवाजविरहित फटाके, झाडे लावा-झाडे जगवा, पाणी वाचवा, प्रदूषण टाळा यांसारखे संदेश दिले. पद्मा गडाख यांनी सूत्रसंचालन केले. कविता शिंदे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com