‘मांजा जीवघेण्या दुर्घटनेचा फणा’ मानवी साखळीतून जनजागृती

‘मांजा जीवघेण्या दुर्घटनेचा फणा’ मानवी साखळीतून जनजागृती

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पतंग (Kite) उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा (Nylon Manja) वापर करणार नाही, अशी शपथ पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील (Padli Pataleshwar Secondary School) विद्यार्थ्यांनी (Students) घेतली. सलग दहाव्या वर्षी विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजा विरोधी जनजागृती (Awareness) करण्याची प्रतिज्ञा घेतली....

‘मांजा जीवघेण्या दुर्घटनेचा फणा’ असे विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून साकारले. यात 300 विद्यार्थी सहभागी झाले. संस्थेचे सचिव प्रा. टी. एस. ढोली, विश्वस्त अरुण गरगटे, चंद्रभान रेवगडे, धनजंय रेवगडे, विष्णूपंत पाटोळे, अशोक रेवगडे, सुरेखा रेवगडे, सुरेखा बोगीर यांनी
उपक्रमाचे कौतुक केले आहे.

यावेळी मुख्याध्यापक एस. बी. देशमुख, शिक्षक बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. सी. शिंगोटे, एम. एम. शेख, सविता देशमुख, टी. के. रेवगडे, सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, ए. बी. थोरे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com