नाशकात चोरट्यांचा उपद्रव; परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे मोबाईल लंपास

नाशकात चोरट्यांचा उपद्रव; परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे मोबाईल लंपास

नाशिकरोड | प्रतिनिधी

येथील बिटको महाविद्यालयात (bitco College Nashikroad) बारावीच्या परीक्षेसाठी (12th Examination) बसलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या दुचाकी गाडीत मोबाईल ठेवले असता सदर विद्यार्थ्यांचे सात ते आठ मोबाईल अज्ञात चोरट्याने दुचाकी गाडीच्या डिकीतून चोरुन नेल्याचा प्रकार आज दुपारी घडला. (mobile robbery) या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका विद्यार्थ्याने उपनगर पोलिस ठाण्यात (Upnagar police station) तक्रार दाखल केली....

बिटको महाविद्यालयात आज बारावीचा मराठी (marathi paper) पेपर होता. परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल नेण्यास परवानगी नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आपले मोबाईल दुचाकी गाडीच्या डिकी मध्ये ठेवले होते.

दरम्यान, विद्यार्थी परीक्षा हॉलमध्ये (examination hall) पेपर देत असल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी मुख्य प्रवेशद्वाराच्या (main entry gate) बाहेर असलेल्या या विद्यार्थ्यांच्या दुचाकी गाडीतून (bikes) सात ते आठ मोबाईल चोरून नेले.

पेपर संपताच विद्यार्थी बाहेर आले, तेव्हा त्यांनी आपल्या गाडीची डिकी उघडली असता त्यांना मोबाईल चोरी झाल्याचे आढळले.

यामध्ये काही विद्यार्थिनींचे सुद्धा मोबाईल चोरी गेले असल्याचे समजले. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी जवळच असलेल्या पोलीस चौकीत जाऊन पोलिसांची संपर्क साधला व मोबाईल चोरी गेल्याची माहिती दिली.

याप्रकरणी प्रसाद सोनार या विद्यार्थ्याने उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याबाबत पुढील तपास सुरू आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com