फी भरली नाही म्हणून विद्यार्थी नापास

माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात पालकांंसह ठिय्या
फी भरली नाही म्हणून विद्यार्थी नापास
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शाळेचे शुल्क School Fees भरण्यास विलंब केल्याचे कारण देत विद्यार्थ्यास नववीत नापास Failed केल्या प्रकरणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकावर School Principal गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी या विद्यार्थ्याच्या पालकासह नाशिक पॅरेट्स असोसिएशनचे Nashik Parents Assocation नीलेश सांळुंखे, प्रदीप यादव यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात Secondary Education Office बुधवारी(दि.24)ठिय्या मांडला.

लॉकडाऊनच्या काळात शाळेचे शुल्क भरण्यास विलंब झाल्याकारणाने राणेनगर येथील सेंट फान्सिस शाळेने एका विद्यार्थ्यास नववीत नापास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्यासाठी या विद्यार्थ्याच्या पालकासह नाशिक पॅरेट्स असोसिएशनचे नीलेश सांळुंखे, प्रदीप यादव यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला.अखेर या प्रकरणी दोन सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली असून चार दिवसांमध्ये ही समिती अहवाल सादर करणार आहे.

राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस शाळेतील At St. Francis School, Ranenagar विद्यार्थी ओम दत्तु आघाव हा मार्च 2020 मध्ये इयत्ता नववीत शिकत होता. लॉकडाऊनच्या काळात परीक्षाच न झाल्यामुळे शाळेने त्याला उत्तीर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, शाळेने शुल्क भरण्याची सक्ती केल्यानंतर पालकाने शाळेची शुल्कही भरले. काही दिवसांनंतर त्यांना ओम आघावचा निकाल घेण्यास बोलवले असता त्याला नापास केले.

मूळात लॉकडाऊनच्या काळात परीक्षाच झालेल्या नसल्याने सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. फक्त एका विद्यार्थ्यालाच नापास का केले? अशी तक्रार दत्तु आघाव यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली. गेल्या वर्षभरात त्यांनी अनेकदा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार करुनही त्यांना न्याय मिळाला नाही. अखेर बुधवारी (दि.24) त्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला.

जोपर्यंत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही, अशी भूमिका घेतली. अखेर माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी नितीन उपासनी यांच्याशी फोनवर बोलून याप्रकरणी द्विसदस्यीय समिती नियुक्त करुन चार दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. या प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

मच्छिंद्र कदम, माध्यमिक शिक्षणाधिकारी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com