Nashik : बारावीचा निकाल लागताच विद्यार्थ्यांचा जल्लोष

Nashik : बारावीचा निकाल लागताच विद्यार्थ्यांचा जल्लोष

नाशिक | Nashik

राज्य शिक्षण मंडळाकडून (State Board of Education) इयत्ता बारावीचा निकाल (HSC Result) आज जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल ९१.२५ टक्के इतका लागला आहे. गेल्या वर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदा निकालात २.९७ टक्के घट झाली आहे...

Nashik : बारावीचा निकाल लागताच विद्यार्थ्यांचा जल्लोष
बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलीच अव्वल, नाशिकचा निकाल किती?

निकालात दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने (Konkan Division) बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.१ टक्के तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.१३ टक्के इतका लागला आहे. याशिवाय नाशिक विभागाचा (Nashik Division) निकाल ९१. ६६ टक्के इतका लागला आहे. तसेच यंदा मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ४.५९ टक्क्यांने वाढले असून राज्यात मुलीच अव्वल ठरल्या आहेत.

Nashik : बारावीचा निकाल लागताच विद्यार्थ्यांचा जल्लोष
Nashik : शिवशाही बस चालकाची बसमध्येच आत्महत्या

दरम्यान, संकेतस्थळावर निकाल (Result) जाहीर होताच नाशकात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांना पेढे भरवत शुभेच्छा दिल्या. तर काही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पास झाल्याचा आनंद दिसून येत होता. तसेच काही विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी मोबाईल तर काहींनी सायबर कॅफेवर गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com