अन्नद्रव्यांची कमतरता; विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या 'या' मोहिमेची सर्वदूर चर्चा

अन्नद्रव्यांची कमतरता; विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या 'या' मोहिमेची सर्वदूर चर्चा

कवडदरा । Kavadara

अन्नद्रव्य (nutrients) अभावामुळे पिकाची (crop) जोमाने वाढ होत नाही परिणामी उत्पन्न कमी येते. पिकाची वाढ खुंटते आणि नवीन येणारी पाने मरु लागतात.यावर उपाय म्हणून योग्य त्यावेळी कृती केलेली बरी तसेच अन्नद्रव्य अभावामुळे पिकावर विविध प्रकारचे लक्षणे दिसून येतात अशी माहिती RAWE & AIA कार्यक्रमाअंतर्गत इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) कवडदरा (Kavadara) येथे कृषि विद्यालय पैठण येथील अंतिम वर्षाचे विदयार्थी हर्षवर्धन कासोळे, आकाश शिरसाट, प्रतीक म्हस्के यांनी शेतकऱ्याना दिली...

पालाशच्या कमतरतेमुळे पानांच्या कडा तांबडसर पडतात. तसेच नत्राचे प्रमाण अतिशय कमी असल्यास संपूर्ण झाडांची पाने खालपासून वरपर्यंत पिवळी होतात. याशिवाय गधकची कमतरता असलेल्या जमिनीत नवीन येणारी पाने पालवी पिवळी पडू लागतात. अशा गंभीर परिस्थितीवर उपाययोजना म्हणून शेतातील लक्षण दिसणाऱ्या पिकाच्या पानांना शेतकऱ्यांना दाखवून त्यावर असणाऱ्या कमतरतेची जाणीव या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना करून दिली.

तर पालाशमुळे होणाऱ्या लक्षणांवर उपाय म्हणून पालशायुक्त रासायनिक खते देण्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच रासायनिक खते ,द्रावण फवारणी, गंधक पुरवणी विषयी योग्य ती माहिती देत उपाययोजना सांगितल्या.

दरम्यान, या संपूर्ण सादरीकरणामध्ये सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. एस. जाधव, माती विज्ञान शाखाप्रमुख डॉ. प्रकाश गीते, प्रमुख तुपकर सर व कार्यक्रम अधिकारी संजय कोकाटे, डॉ.अतुल वराडे व डॉ. निलम कणसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच यावेळी शेतकरी (farmer) मंगेश उगले, विठ्ठल पवार,संतोष कचरे,संदीप टकले, ज्ञानेश्वर म्हस्के उपस्थित होते. तर संतोष थिटे यांच्या शेतात हा उपक्रम पार पाडण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com