दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थ्यांच्या शस्त्रक्रिया

दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थ्यांच्या शस्त्रक्रिया

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (National Child Health Program) अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व शिक्षण विभाग (Department of Education) पंचायत समिती दिंडोरी (Dindori) यांंच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात (Dindori Rural Hospital) पाच विद्यार्थ्यांच्या (Students) यशस्वी शस्रक्रिया (Successful surgery) करण्यात आल्या.

दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकीय अधीक्षक डॉ. विलास पाटील (Medical Superintendent Dr. Vilas Patil) यांचे मार्गदर्शन खाली शस्रक्रिया शिबिराचे (Surgery camp) ग्रामीण रुग्णालय दिंडोरी येथे आयोजन करण्यात आले. आरबीएसके पथकाच्या वतीने शालेय आरोग्य तपासणीमध्ये संदर्भित विद्यार्थ्यांची शल्यचिकित्सक (Surgeon) यांनी तपासणी करून पाच विद्यार्थ्यांची शस्रक्रिया करण्यासाठी निवड करण्यात आली.

सिव्हिल हॉस्पिटलचे सर्जन डॉ. बाबूलाल अग्रवाल, भुलरोगतज्ञ डॉ. अमृता पोळ, डॉ. देवीप्रसाद शिवदे, डॉ. विलास पाटील हे शस्रक्रिया प्रसंगी उपस्थित होते. चार विद्यार्थ्यांच्या टाळूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये जीभ टाळूला चिकटलेली असते. त्यामुळे वाचदोष निर्माण होतो. बोलण्यात अडथळा निर्माण होतो. परिणामी अध्ययन अध्यापन प्रक्रियेत विपरीत परिणाम होतो.

त्यामुळे या विद्यार्थ्यांची शस्रक्रिया झाल्याने वाचदोष दूर होणार असून या विद्यार्थ्यांना स्पीच थेरेपी (Speech therapy) दिली जाणार आहे. एका विद्यार्थ्यांची फायमोसिसची शस्रक्रिया (Surgery of phimosis) करण्यात आली. यानंतर ग्रामीण रुग्णालयाचे वतीने डॉ. अग्रवाल, डॉ. पोळ, डॉ. शिवदे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शिक्षण विभागाचे गट शिक्षणाधिकारी बी. डी. कनोज, विशेषतज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर, डॉ. समर्थ देशमुख, डॉ. दीपक बागमर, डॉ. समीर पाटील, डॉ. तुषार पाटील, डॉ. नितीन भडकवाड, डॉ. प्रशांत राऊत, डॉ. सुचिता कोशिरे, डॉ. प्रियंका भुजबळ, डॉ. अश्विनी वाकचौरे, डॉ. गौरी निराहली, डॉ. सीमा गांगुर्डे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.