एनएमएमएस परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

एनएमएमएस परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

मखमलाबाद | वार्ताहर | Makhamalabad

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या (MVP) श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथील चार विद्यार्थ्यांनी एन.एम.एम.एस. (NMMS) या राष्ट्रीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले...

ही परीक्षा २००७-०८ पासून मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस भारत सरकार,नवी दिल्ली यांच्यामार्फत राबविली जाते. या परीक्षेत विद्यालयातील अनुष्का सचिन गिते हिने १२५ गुण (७२.२५%) मिळवून नाशिक जिल्ह्यात चतुर्थ क्रमांक मिळविला.

श्रावणी संजय कांडेकर, स्नेहल शामकांत कोठावदे, समृध्दी दिलीप पानसरे यांनी अनुक्रमे जिल्ह्यात ५१, ६७ व ८४ क्रमांक प्राप्त करुन गुणवत्ता यादीत आपले स्थान पटकावले. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या चारही विद्यार्थिनींना वार्षिक १२ हजार रुपये शिष्यवृत्ती सलग चार वर्षे म्हणजे इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंत एकूण ४८ हजार रुपये मिळतील.

यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य लालजी आवारे, उपप्राचार्य रायभान दवंगे, पर्यवेक्षिका माधुरी थेटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना उपशिक्षिका मोनाली बेंडकुळे, किर्ती जाधव, अर्चना दिघे, प्रमिला शिंदे, मनिषा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com