विद्यार्थी-पालकांचा लसीकरणास प्रतिसाद

विद्यार्थी-पालकांचा लसीकरणास प्रतिसाद

दिंडोरी । संदीप गुंजाळ Dindori

शासनाच्या आदेशानुसार आरोग्यविभागाच्या वतीने 15 ते 18 वयोगतील विद्यार्थ्यांना कोविड 19 ची कोवॅक्सिन corona Vaccines लस देण्यास सुरुवात झाली आहे.दिंडोरी Dindori Taluka तालुक्यात शाळा स्तरावरच लसीची उपलब्धता करून देवून यशस्वीपणे लसीकरण मोहीम राबवली जात आहे. खेडगाव, दिंडोरी, जानोरी, कोर्‍हाटे Dindori, Janori, Korhata आदी शाळांमध्ये लसीकरण Vaccination Campaign मोहीम राबवली गेली आहे.यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

खेडगाव Khedgaon येथील नवोदय विद्यालयातील 9 वी व 10 वीचे विद्यार्थ्यांना लसीकरण करून या मोहिमेचा शुभारंभ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी केले. त्यानंतर दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 10 वी व ज्यू कॉलेज विज्ञान विभागातील विद्यार्थी, जानोरी येथील महात्मा फुले विद्यालयातील 9 वी व 10 वीचे विद्यार्थी, कोर्‍हाटे येथील जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांना वयोगटानुसार शाळा स्तरावरच लसीकरण मोहीम राबवली गेली. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी मिळाला.

दिंडोरी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून व संबंधित शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या सहकार्यातून यशस्वीपणे लसीकरण मोहीम राबवली जात आहे. यावेळी लसीकरण करतांना विद्यार्थ्यांना लसीकरणाचे फायदे व महत्व पटवून देत प्रोत्साहन दिले गेले. 15 ते 18 वयोगटातील मुलांना लसीकरण देण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर ती मोहीम शाळा स्तरावरच लसीची उपलब्धता करून देवून मुलांचे लसीकरण करून घ्यावे अशी मागणी पालकांनी केली. त्याची दखल शासनस्तरावर घेण्यात येवून आरोग्य विभाग व शिक्षण विभागाने एकत्रितपणे समन्वयातुन ही मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.

सध्या करोनाचा वाढता प्रभाव बघता सर्वांनी दोन्ही लस घेऊन आपली सुरक्षितता करून घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. शिक्षण विभागाकडून देखील आवश्यक खबरदारी घेत शाळेत कोरानाचा शिरकाव होवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी लसीकरण करून घेण्यासाठी आरोग्य विभागाला आवश्यक सहकार्य करून विद्यार्थांचे लसीकरण करून घेतले जात आहे.

शाळा स्तरावर सध्या विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाते आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून लसीच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने सर्व तालुक्यातील एकूण 15744 विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. कुणीही वंचित राहणार नाही यासाठी आम्ही काळजी घेत आहोत. तरी पालकांकडून देखील यासाठी सहकार्य अपेक्षित आहे. लसीकरणावेळी आरोग्य विभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून लसीकरण करून घ्यावे.

डॉ. सुभाष मांडगे, तालुका वैद्यकीय अधिकारी, दिंडोरी

15 ते 18 वयोगटातील मुलांना लसीकरण देण्याचे काम प्रगतीपथावर चालू आहे. त्यासाठी आरोग्य विभागाला शाळास्तरावर आवश्यक ते सहकार्य शिक्षण विभागाकडून केले जात आहे. याआधी महाविद्यालयील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. तरीही शाळेत कुणीही वंचित राहणार नाही याची काळजी स्थानिक स्तरावर घेण्यात यावी. पालकांनीही आवश्यक सहकार्य करून आपल्या पाल्याच्या सुरक्षिततेला महत्व द्यावे.

भास्कर कनोज, गटशिक्षणाधिकारी, दिंडोरी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com