
अवनखेड । Avankhed
दिंडोरी (Dindori) तालुक्यातील अवनखेड येथे सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पंधरा वर्षीय विद्यार्थ्याचा तळ्यात बुडून मृत्यू झाल्याने अवनखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी समाधान बकाराम कोकाटे (15) इयत्ता नववीत शिकणारा हा विद्यार्थी मित्र बरोबर तेथील एका वाघदेव नगर वस्ती जवळ असलेल्या गावतळ्यात पोहण्यासाठी गेले.
यावेळी समाधान कोकाटे या विद्यार्थ्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे अवनखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.