भदर येथील विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू

सुरगाणा तालुक्यातील घटना
भदर येथील विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू

सुरगाणा | Surgana

भदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत असलेला आठ वर्षीय विद्यार्थी योहान शिवा वार्डे हा मित्रांसोबत तलावाकडे अंघोळीला गेला असतांना पाय घसरून पाण्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास योहान अजून घरी का परतला नाही म्हणून घरच्यांनी शोधा शोध सुरु केला. दुपारच्या वेळी काही मुले अंघोळीसाठी तलावाकडे गेली होती. पालकांनी तलावाकडे शोध घेतला असता तो मृतावस्थेत तलावात आढळून आला.

तलावाच्या भरावाची उतरण असल्याने तो पाय घसरून पाण्यात पडला, पण त्यास खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून अंत झाला.

योहानचे आईवडील मोलमजुरी निमित्ताने त्यास आजीकडे सोपवून पिंपळगाव भागात गेले होते. पोलिस पाटील मोहन गांगुर्डे यांनी भ्रमणध्वनीद्वारे हि माहिती पोलिसांना दिली. त्यास तात्काळ सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले.

आकस्मिक मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. दोन वर्षापुर्वी अशाच प्रकारे अंघोळीसाठी गेलेल्या दोन बालकांचा याच तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com