
जातेगाव | वार्ताहर | Jategaon
जातेगांव येथे प्रजासत्ताक दिनी शालेय प्रभातफेरी दरम्यान चक्कर येऊन जमिनीवर पडलेल्या विद्यार्थिनींचा उपचाराअगोदरच दूर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे...
नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथील मविप्र समाज संस्थेच्या जनता माध्यमिक विद्यालयात इयत्ता ९ वी च्या वर्गात शिक्षण घेणारी विद्यार्थीनी पूजा दादासाहेब वाघ (१५) ही प्रजासत्ताक दिनी आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर सकाळी आठ वाजता प्रभातफेरीतून ग्रामपालिकेकडे जात होती.
मुलगी अचानक चक्कर येऊन जमिनीवर पडली असता तिला तत्काळ बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. पूजा हिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगत वैद्यकीय अधिकारी डाॅ. जायभार यांनी ताबडतोब नांदगाव येथे उपचारासाठी पाठविले.
नांदगाव हे जातेगांवपासून ३५ किमी अंतरावर असल्याने रुग्णालयात वेळेवर पोहचण्याअगोदरच पूजाची प्राणज्योत मावळली. दूपारी जातेगांव येथे शोकाकूल वातावरणात तिच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले.