क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास: तुंगार

क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास: तुंगार

कसबे सुकेणे । वार्ताहर | Kasbe Sukene

विद्यार्थ्यांना (students) शालेय अभ्यासक्रमाबरोबरच (School syllabus) क्रीडा स्पर्धांचे (Sports competitions) विशेष आकर्षण असते.

या क्रीडा स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकासच (Physical and mental development) होतो असे प्रतिपादन निफाड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार (Niphad Panchayat Samiti Group Education Officer Keshav Tungar) यांनी केले आहे.

मौजे सुकेणे येथील कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्यु कॉलेज विद्यालयात आयोजित क्रीडा स्पर्धा व गणित विज्ञान रांगोळी स्पर्धांचे उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून तुंगार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेचे उपसभापती देवराम मोगल होते. सुरुवातीला गटशिक्षणाधिकारी तुंगार, संस्थेचे उपसभापती मोगल, प्राचार्य रायभान दवंगे, उपमुख्याध्यापक शिवाजी कोटकर आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले.

प्रास्ताविकातून प्राचार्य दवंगे यांनी विद्यालयात सुरू असलेले उपक्रम व भविष्याची वाटचाल विषद केली. तर अध्यक्षीय मनोगतातून संस्थेचे उपसभापती देवराम मोगल यांनी क्रीडा स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांना एक पर्वणीच असते. शाळेने नेहमीच विद्यार्थ्यांच्या (students) अध्यापन व अध्यापन पूरक गोष्टींकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी विद्यालयातील विभागीय स्तरावर व राज्यस्तरावर गेलेल्या खेळाडूंचा (players) व गुणवंत शिक्षकांचा (teachers) प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अतिथींच्या हस्ते गणित, विज्ञान रांगोळी स्पर्धा व क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद ताकाटे यांनी तर भारत मोगल यांनी आभार मानले. याप्रसंगी शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com