विद्यार्थी अपघाती मृत्यू; 'इतके' प्रस्ताव मंजूरीच्या मार्गावर

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
विद्यार्थी अपघाती मृत्यू; 'इतके' प्रस्ताव मंजूरीच्या मार्गावर

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत (Rajiv Gandhi Student Accident Relief Grant Schemes) जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण (Primary education) घेणारे 40 आणि माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या

5 विद्यार्थ्यांचा (students) अपघाती मृत्यृ (Accidental death) झाल्याप्रकरणी लाभ मिळण्याबाबत जिल्हा परिषदेच्या (zilha parishad) प्राथमिक शिक्षण विभागाला (Department of Primary Education) 48 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

त्यापैकी 45 प्रस्ताव मंजुरीच्या मार्गावर असुन उर्वरीत 3 प्रस्तावांविषयी कागदोपत्री अडचणी निर्माण झाल्यामुळे त्यांचा निपटारा त्वरेने करण्याचा प्रयत्न प्राथमिक शिक्षण विभागातर्फे (Department of Primary Education) करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला एकूण 48 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. पैकी माध्यमिक विभागातर्फे 31 प्रस्ताव दाखल असुन यापैकी 28 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. तर 3 प्रस्ताव प्रलंबित आहेत.

प्राथमिक विभागातर्फे 17 प्रस्ताव दाखल असुन संपूर्ण 17 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. एकूण 48 प्रस्तावापैकी 45 प्रस्ताव हे किरकोळ दुरुस्तींसह मंजुरीच्या मार्गावर असून उर्वरीत 3 प्रस्तावांना देखील कागदोपत्री निर्माण झालेली अडचण दूर करण्याचा प्रयत्न प्राथमिक शिक्षण विभाग करीत आहे. इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यतच्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू (Accidental death of student) झाल्यास राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत (Rajiv Gandhi Student Accident Relief Grant Schemes) त्या विद्यार्थ्याला शासनातर्फे दीड लाख रुपये सानुग्रह अनुदान (subsidy) देण्यात येते.

त्याचबरोबर अपघातामुळे (accidents) कायमचे अपंगत्व आल्यास (दोन अवयव/दोन डोळे किंवा 1 अवयव व 1 डोळा निकामी) 1 लाख रुपये किंवा (1 अवयव किंवा 1 डोळा कायम निकामी) झाल्यास 75 हजार रुपये किंवा अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास प्रत्यक्ष हॉस्पिटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त 1 लाख रुपये, सर्पदंशाने मृत्यू झाल्यास दीड लाख रुपये राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेद्वारे शासनामार्फत दिले जातात.

1 ऑक्टोबर 2013 च्या शासन निर्णयानुसार अपघातात मृत्यू झाल्याप्रकरणी विद्यार्थ्याला 75 हजार रुपये सानुग्रह अनुदान अनुज्ञेय असुन शासनाने या निर्णयात सुधारण करीत 21 जून 2022 पासून ही रक्कम दुप्पट म्हणजेच दीड लाख रुपये केली आहे.

....तर कै. करण गवारेला मिळाले असते दीड लाख

कै. करण मच्छिंद्र गवारे हा दिंडोरी तालुक्यातील विद्यार्थी 20 जून 2022 रोजी बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यात ठार झाला होता. मात्रसुधारित शासन निर्णय हा 21 जून 2022 पासून लागू झाला. केवळ 1 दिवसाचे अंतर आल्याने कै. करण मच्छिंद्र गवारे याच्या पालकांना 75 हजार रुपये सानुग्रह अनुदान अनुज्ञेय असणार आहे. हाच शासन निर्णय 20 जून पासून लागु झाला असता तर करण गवारे याच्या पालकांना दीड लाख रुपये अनुदान प्राप्त झाले असते अशी चर्चा व हळहळ जिल्हा परिषदेत व्यक्त होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com