एसटीच्या स्मार्ट कार्ड  योजनेला मुदतवाढ
नाशिक

एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेला मुदतवाढ

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला 15 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन या योजनेला पुन्हा 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 27 विविध सामाजिक घटकांना 33 टक्क्यांपासून 100 टक्क्यांपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांना आधार कार्ड क्रमांकाशी निगडीत असलेले स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे.

त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारात ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण, करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्ड घेणे शक्य नसल्याने तसेच त्यासंबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्याने या योजनेला 30 नोव्हेंबर 2020पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ज्या भागात एसटी बसेस सुरू असतील त्या भागांमध्ये प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com