दररोज सव्वादोन लाख किलोमीटर धावणारी लालपरी..!

कडक निर्बंधांचा फटका; लांबपल्ल्याची बससेवा ठप्प
दररोज सव्वादोन लाख किलोमीटर धावणारी लालपरी..!
बस सेवा


नाशिक | Nashik

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी लागू आहे. यात सार्वजनिक परिवहन सेवा सुरू असली तरी त्यास प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने लांबपल्ल्याची बस वाहतूक ठप्प पडली आहे. जिल्ह्यातही एसटीची प्रवासी बससेवा कोलमडली आहे.

नाशिक विभागातील एसटी दररोज सव्वादोन लाख किलोमीटर धावत होती. त्यातून एसटी महामंडळाच्या तिजोरीत सुमारे ६० लाखांची भर पडत होती. आता हे उत्पन्न काही हजारांवर पोहचले असून एसटी महामंडळाच्या अडचणींत भर पडली आहे.

दररोज सकाळी नेहमीप्रमाणे जुने सीबीएस, महामार्ग आणि ठक्कर बाजार येथे बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज असतात. मात्र, प्रवाशीच नसल्याने बसचालक आणि वाहकांना ताठकळत बसावे लागले. यास एखाद्या फेरीचा अपवाद असला तरी बहुतांश बस चालक आणि वाहकांना कर्तव्य न बजावता घरी परतावे लागते.

धुळे मार्गाला पसंती
ठक्कर बाजार बसस्थानकात प्रवाशांची तुरळक गर्दी असते. धुळे मार्गावर प्रवाशांची मागणी जास्त असल्याने तेथे बस सोडण्यात येते. इतर मार्गावर प्रवाशांनी पाठ फिरविले आहे. त्यातच क्षमतेपेक्षा जादा प्रवासी न घेण्याच्या सुचना असल्याने एसटीसाठी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com