न्यायालय इमारतीसाठी प्रयत्नशील

पालकमंत्री छगन भुजबळ यांची ग्वाही
न्यायालय इमारतीसाठी प्रयत्नशील

अंबासन । वार्ताहर Ambasan- Satana)

सटाणा (satana) न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीबाबत मुख्यमंत्री (chief minister) व विधी व न्याय खात्याचे (Law and Justice Department) मंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याशी चर्चा करून सकारात्मक प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे.

सटाणा येथील न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीचे बांधकाम (Construction of the building) होण्यासाठी येथील वकील संघाच्या (bar association) पदाधिकार्‍यांनी पालकमंत्री भुजबळ यांची भेट घेवून मागणीचे निवेदन दिले असता ना. भुजबळ यांनी वरिल आश्वासन दिले. सटाणा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या (civil and criminal courts) इमारतीचे सन 1883 मध्ये बांधकाम झाले आहे. सध्याच्या स्थितीत कामकाज करण्यासाठी जागा अपुरी पडत आहे.

त्यामुळे येथे नवीन विस्तारित इमारत बांधणे गरजेचे असल्याचे सटाणा वकील संघाच्या पदाधिकार्‍यांनी ना. भुजबळ यांच्या निदर्शनास आणून दिले. विधी व न्याय खाते हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच असून त्यांची प्रत्यक्ष भेट घेवून नवीन इमारतीबाबत चर्चा करून हा प्रश्न सोडवू असे आश्वासन ना. भुजबळ यांनी शिष्टमंडळाशी बोलतांना दिले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पगार, वकील संघ अध्यक्ष अ‍ॅड. पंडितराव भदाणे, उपाध्यक्ष अ‍ॅड. एन.पी. चंद्रात्रे, सचिव अ‍ॅड. आर.एम. जाधव, अ‍ॅड. सी.एन. पवार, अ‍ॅड. पी.के. गोसावी, संदीप अहिरे आदींसह पदाधिकारी सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.