करवसुलीसाठी मनपा प्रशासनाकडून धडक कारवाई; मालमत्ता सील

करवसुलीसाठी मनपा प्रशासनाकडून धडक कारवाई; मालमत्ता सील

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

मालेगाव मनपा प्रशासनाने ( Malegaon Municipal Administration)करवसुलीसाठी कठोर पवित्रा घेत मालमत्ता सील करण्यासह नळांचा पाणीपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. भायगाव परिसरात आठ मालमत्ता तर द्याने भागातील यंत्रमाग कारखाना सील करण्यासह दोघा थकबाकीदारांची नळजोडणी खंडित केली.

मनपाने मालमत्ता (Property Tax )व पाणीपट्टी कराची (Water Bills )थकबाकी वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र कर भरण्यासाठी अंतिम नोटिसा बजावूनदेखील अनेक थकबाकीदारांनी कर भरलेला नसल्याने अशांविरुद्ध मालमत्ता जप्ती व नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त भालचंद्र गोसावी( Commissioner of Malegaon Municial Coporation - Bhalchandra Gosavi ) यांनी दिले होते.

प्रभाग दोनमधील द्याने भागातील मालमत्ता करापोटी दोन लाख 34 हजार 328 रुपयांची थकबाकी असलेल्यांचा यंत्रमाग कारखाना सील करण्यात आला, तर इस्लामपुरा भागातील पाणीपट्टी कर न भरणार्‍या दोघांची नळजोडणी खंडित करण्यात आली. या मोहिमेमुळे इतर थकबाकीदारांनी 40 हजारांची थकबाकी त्वरित मनपात भरली.

या मोहिमेत सहाय्यक आयुक्त सचिन महाले, शाम बुरकुल, जप्ती अधिकारी दिनेश मोरे, मोहंमद इरफान, अनिल सांगळे, सचिन ढिलोर, अजित बच्छाव, विनोद बोरकर, देवीदास भोये, यासीन बेग, आप्पा अहिरे आदींसह अधिकारी, सेवक सहभागी झाले.

कराची थकबाकी न भरणार्‍या जिग्नेश हरिभाऊ पटेल, मेवाणी जयशंकर तिवारी, जितेंद्र रमेश राजारामा, कमलेश संभाजी बिरारी, भिका श्रीधर वाणी, राजेंद्र शांताराम बागड, प्रमोद दत्तात्रेय सोनजे, सरिता विजय पवार यांच्या मालमत्ता सील करण्याची कारवाई नियंत्रण अधिकारी सुनील खडके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग अधिकारी जगदीश बडगुजर, जयवंत पाटील, राजेश दिवे, पूनमचंद जाधव यांच्या पथकाद्वारे केली गेली. कारवाईने अनेकांनी मनपात धाव घेतली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com