दिंडोरी नगर पंचायत कर्मचार्‍यांचा संपाचा इशारा

किमान वेतन देण्यास प्रशासनाची टाळाटाळ
दिंडोरी नगर पंचायत कर्मचार्‍यांचा संपाचा इशारा

दिंडोरी । नितीन गांगुर्डे Dindori

कामगार उपायुक्तांनी दिंडोरी नगरपंचायत कर्मचार्‍यांना ( Dindori Nagar Panchayat Employees ) किमान वेतन (Minimum wages ) लागु करण्याचे आदेश देऊनही दिंडोरी नगरपंचायत प्रशासन सुधारित किमान वेतन लागु करत नसल्याने दिंडोरी नगरपंचायतीच्या 40 ते 50 कामगारांनी 1 सप्टेंबर पासुन संपावर ( Strike ) जाण्याचा निर्णय घेतला आहे.

दिंडोरी ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायत निर्माण झाली.त्यानंतर ग्रामपंचायत कालीन कर्मचार्‍यांचे समावेशन झाले नाही. तथापी त्यांना किमान वेतन लागु होणे आवश्यक होते.त्यामुळे दिंडोरी नगरपंचायत कर्मचार्‍यांनी कामगार उपायुक्तांकडे तक्रार अपिल दाखल केले. दिंडोरी कामगारांची बाजु न्याय्य असल्याने कामगार उपायुक्तांनी नगरपंचायत प्रशासनाला पाचारण केले.परतु तीन ते चार बैठकांना नगरपंचायतीचे अधिकारी गैरहजर राहिले. त्यानंतर कामगार उपायुक्तांनी किमान वेतन लागु करण्याचा आदेश दिला.

परंतु प्रशासनाने वेळकाढु धोरण स्विकारले व कर्मचार्‍यांची वर्गवारीही मागितली.त्यानंतर कामगार उपायुक्तांनी कर्मचार्‍यांची वर्गवारीही करुन दिली. तरीही दिंडोरी नगरपंचायत प्रशासनाने कर्मचार्‍यांना सुूधारित किमान वेतन लागु केला नाही. त्यामुळे कर्मचारी आता संतापले आहेत. करोना काळात अतिशय प्रामाणिकपणे कर्मचार्‍यांनी जीवाची पर्वा न करता काम केले. वेळप्रसंगी रात्री अपरात्री धावुन आले. तरीही त्यांच्या कामाचे मुल्यमापन न झाल्याने व न्याय मिळत नसल्याने सर्व कर्मचार्‍यांनी 1 सप्टेंबर पासुन बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत दिंडोरीचे प्रांत डॉ. संदिप आहेर, तहसिलदार तथा प्रशासक पंकज पवार, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवले यांना निवेदन देण्याच आले आहे. या निवेदनात सुधारित किमान वेतन अधिनियमानुसार जुलै 2021 च्या पगारात मिळावा व नगरपंचायत स्थापनेपासुन आतापर्यतच फरक मिळावा अशी प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

त्याचबरोबर ग्रमापंचायत असतांना सफाई कर्मचारी, संगणक ऑपरेटर, पाणीपुरवठा व इतर सर्व विभागातील कर्मचार्‍यांची आस्थापना आहे तीच ठेवण्यात येऊन त्यांना किमान वेतन लागु करावे , ठेकेदाराकडे काम करीत असलेल्या कर्मचार्‍यांना आणि कंत्राटी कामगार यांनाही किमान वेतन मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने यावर मार्ग काढावा अशी मागणी कर्मचार संघटनेचे भारत कापसे, सुधाकर चारोस्कर, निर्मला सोलंकी, गोटीराम मेधणे, विजय केदारे, संपत शार्दुल, रंजना निकम, सुमन शार्दुल, दशरथ निकम, कमलाकर गांगुर्डे आदींनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com