मुद्रांक विक्रेत्यांच्या जागेसाठी प्रहार संघटनेचे उपोषण

मुद्रांक विक्रेत्यांच्या जागेसाठी प्रहार संघटनेचे उपोषण

देवळा । प्रतिनिधी Deola

देवळा (Deola) शहरातील जुन्या तहसील कार्यालय (Tehsil Office) आवारातील मुद्रांक विक्रेत्यांना (Stamp sellers) नवीन तहसील कार्यालय आवारात जागा देवून स्थलांतरीत करावे या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या (Prahar Sanghatna) वतीने तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर वाघ्यामुरळी पथकासह बेमुदत उपोषणास प्रारंभ केला गेला.

वाघ्यामुरळीच्या गोंधळात सुरू झालेल्या या उपोषणास सायंकाळी प्रभारी तहसीलदार विजय बनसोड यांनी भेट देत उपोषणकर्त्यांशी चर्चा करत लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. तहसील कार्यालय वाजगाव-खर्डे रोडवर (Vajgaon-Kharde Road) बांधण्यात आलेल्या नुतन प्रशासकीय कार्यालयात (New administrative offices) स्थलांतर झाले मात्र मुद्रांक विक्रेते हे अद्यापही जुन्या तहसील आवारातच आहेत.

नवीन तहसील कार्यालय हे शहरापासून सुमारे तीन ते चार कि.मी. अंतरावर असल्याने शासकीय कामासाठी जाणार्‍या वयोवृध्द, गोरगरिब, अपंग व शेतकर्‍यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो. एका कामासाठी अनेक चकरा माराव्या लागतात.

नवीन प्रशासकीय कार्यालय आवार परिसरात भरपूर मोकळी जागा शिल्लक आहे. संबधित मुद्रांक विक्रेत्यांना जनहितार्थ स्थलांतरीत करण्यात यावे यासाठी अनेक वेळा अर्ज, विनंत्या करण्यात आल्या मात्र कोणतीही दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ प्रहार संघटनेतर्फे हे आंदोलन (Movement) हाती घेण्यात आल्याचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव यांनी सांगितले.

आंदोलनात जिल्हा कार्याध्यक्ष दशरथ पुरकर, तालुकाध्यक्ष संजय दहिवडकर, भाऊसाहेब मोरे, नानाजी आहेर, बापुसाहेब देवरे, शशिकांत पवार, अर्जुन देवरे, काकाजी देवरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

प्रभारी तहसीलदार विजय बनसोड यांनी उपोषणकर्त्यांना आपल्या मागणीबाबतचे पत्र जिल्हाधिकारी (गृह शाखा) यांना पुढील माहितीस्तव पाठविण्यात आले असून वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यावर मुद्रांक विक्रेत्यांना वाजगावरोड येथील नवीन प्रशासकीय इमारत आवारात जागा उपलब्ध करुन देण्याबाबत उचित कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्याने बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले.

Related Stories

No stories found.