शहर, जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन

जिल्हासीमा, शहरात नाकाबंदी द्वारे चौकशी, बाहेरून मिळणार कुमक
शहर, जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन
नाशिक शहर पोलिस

नाशिक । Nashik

नाशिक शहर तसेच जिल्ह्यात 12 ते 22 मे दरम्यान घोषीत लॉकडाऊन उद्या रात्रीपासून लागू होणार आहे. नाशिक शहरात 40 ठिकाणी नाकाबंदी पाँईट्स असणार आहे. तर जिल्ह्यात येणार्‍या सर्व 8 मार्गांवर सीमेवरच तपासणी नाक्यांद्वारे प्रत्येक वाहनाची तपासणी होणार आहे. याहस जिल्ह्यातील प्रत्येक शहर, मोठ्या गावांमध्ये पोलीस नाके असणार आहेत, नियम मोडणार्‍या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

करोनाचा वाढता प्रसार, तिसर्‍या लाटेचा संभाव्य धोका आणि लसीकरणातील अनियमीतता या सर्व बाबी सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने 12 ते 22 या दहा दिवसांसाठी कडकलॉकडाऊनची घोषणा केली आहे. या दहा दिवसात दुसर्‍या लाटेतील करोनाची साखळी पूर्णत: तोडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.

यासाठी पूर्वीपेक्षा नियम अधिक कठोर करण्यात आले असून, नागरिकांची गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी शहर पोलिसांकडे सोपविण्यात आली आहे. याबाबत बोलताना पोलिस सूत्रांनी सांगितले की, शहरात 40 नाकाबंदी पाँईट्स लावण्यात आले आहे. ही संख्या मोठी असून, नाकाबंदी पाँईट्समध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येतील.

यापूर्वी शहरात नाकाबंदी पाँईट्स होते. मात्र, येथे नागरिकांना अडविण्यात येत नव्हते. आपत्तकालीन परिस्थितीमध्ये घराबाहेर पडणार्‍या नागरिकांना अडचण येऊ नये यासाठी चौकशी, कारवाई करण्यात येत नव्हती. मात्र, बुधवारी दुपारी 12 वाजेनंतर मात्र कोणतीही सुट मिळणार नाही. नागरिकांना नियमांचे पालन करावेच लागणार आहे.

वैद्यकीय कारण वगळता इतर सर्व कारणांसाठी फिरणे चुकीचे ठरणार असून, पोलिसांकडून ठोस कारवाई करण्यात येईल, असे संबंधित अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. जिल्ह्याच्या ग्रामिण भागात विविध ठिकाणांवरून जिल्ह्यात येणार्‍या सर्व 8 मार्गांवर तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असे 15 तपासणी नाके असणार आहेत.याबरोबरच त्या त्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गस्ती पथके कार्यरत राहणार आहेत. जिल्ह्याच्या ग्रामिण दलाने 1 हजार होमगार्ड तसेच राज्यराखीव दलाच्या एका कंपनीची मागणी केली आहे. ही कुमक लवकरच उपलब्ध होणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगीतले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com