जिल्ह्यात रात्री आठ वाजेपासून कडक निर्बंध

काय सुरू, काय बंद राहणार
जिल्ह्यात रात्री आठ वाजेपासून कडक निर्बंध
USER

नाशिक | Nashik

करोनाची साखळी तोडण्यासाठी व दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी 'ब्रेक दि चेन' मोहीम सुरू करून आता १५ दिवस आणखी कडक निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

हे नियम १४ एप्रिल २१ च्या रात्री ८ वाजेपासून लागू होणार आहेत. जिल्हा प्रशासनाने याबाबत पूर्ण तयारी केली आहे. कायदा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई देखील होणार आहे.

मागील वर्षी ज्याप्रमाणे लॉक डाऊनमध्ये सर्व प्रकारचे व्यवहार बंद करण्यात आले होते तशी परिस्थिती यंदा राहणार नसल्यामुळे काहीसा दिलासा देखील राज्य शासनाने दिला आहे.

जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने उघडून ठेवण्यास परवानगी देण्यात आली असली तरी गर्दी होत असल्यास अशा बाजारपेठा किंवा दुकाने बंद करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत तसेच गर्दी झाल्यास व बाजारपेठ बंदही केल्यास जाऊ शकतात, विवाहासाठी फक्त 25 जणांना परवानगी देण्यात आली आहे. पूर्वी 50 जणांचा परवानगी होती.

नव्या आदेशानुसार विवाहस्थळी उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांची करोना चाचणी बंधनकारक राहणार असून त्याचे प्रमाणपत्र नसल्यास एक हजार रुपये व व्यवस्थापकाला दहा हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे अंत्यविधीसाठी 20 जणांनाच उपस्थित राहता येईल.

ही कार्यालय सुरू राहणार

केंद्र तसेच राज्य सरकारची कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्था

सरकारी सहकारी व खाजगी बँका आवश्यक सेवा पुरवणाऱ्या कंपन्या औषध निर्मिती कंपन्या विमा व आरोग्य विमा

रिझर्व बँकेचे नियंत्रण करणाऱ्या वित्तीय संस्था

बिगर बँकिंग वित्तीय संस्था सूक्ष्म भांडवल पुरवठा वित्तीय संस्था

न्यायालय संबंधित वकिलांची कार्यालय

सर्व कार्यालयात पन्नास टक्के उपस्थिती मर्यादा राहणार आहे.

करोना नियंत्रणाची निगडीत कार्यालयांमध्ये ती क्षमता गरजेनुसार कमी-जास्त करण्यात येईल. तर सर्व सरकारी व खाजगी कार्यालयांनी कार्यालयइन कर्मचाऱ्यांच्या लसीकरण याची काळजी घ्यावी,

हे बंद राहणार आहे

शाळा महाविद्यालय खाजगी शिकवण क्लासेस

उपहारगृहे, बार

उद्याने, चौपाट्या चित्रपटगृहे, नाट्यगृहे व व्यायाम शाळा देखील बंद राहणार आहे.

क्रीडा संकुले, वॉटरपार्क, चित्रपट मालिका किंवा जाहिरातीचे चित्रीकरण मॉल्स व्यापारी संकुले

धार्मिक स्थळे

केश कर्तनालय, ब्युटीपार्लर पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

संचारबंदीत केवळ जीवनावश्यक वस्तू व सेवांची दुकाने, त्यांच्याशी निगडित वाहतूक आणि इतर सुविधा सुरू राहतील. या काळात कोणत्याही व्यक्तीला सबळ कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही, सकाळी सात ते रात्री आठ या काळात आवश्यक उद्योग सेवा सुरू राहतील.

उपनगरीय रेल्वे सेवा, रिक्षा, टॅक्सी बस वाहतूक या सारख्या सार्वजनिक तसेच खाजगी वाहतूक सेवा सुरू राहतील पण आवश्यक सेवांसाठी काम करणाऱ्यांनाच त्यांचा उपयोग करता येईल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com