सातपूर l Satpur (प्रतिनिधी)

राज्य शासनाने लॉकडाऊनची घोषणा केलेली नसली तरी कडक निर्बंध लावलेले आहेत. उद्योग क्षेत्राला यातून वगळण्यात आले असले तरी काही निर्बंधाचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले असल्याचे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी सांगितले.

औद्योगिक क्षेत्रात लॉक डाऊन नसले तरी उद्योजकांनी कामगारांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याचे बंधन शासनाने घातलेली आहेत. जास्त कामगार असलेल्या कारखान्यांनी कामगारांची तपासणी करून आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधन कारक करण्यात आली आहे.

त्यासोबतच प्रत्येक कामगारांना व्हॅक्सिनची प्रतिबंधक लस देणेही बंधनकारक आहे. मोठ्या उद्योगांनी बाधित कामगाांसाठी कारखान्याच्या आवारातच विलगीकरण कक्ष उभारुन कामगारांची व्यवस्था करण्याची गरज आहे.

छोट्या उद्योजकांनी शासनाने घालून दिले आहेत. शासनाने नेमुन दिलेल्या नियमांप्रमाणे प्रतिबंधकात्मक सुविधा कारखान्यांमध्ये उपलब्ध करणे गरजेचे आहे. कामगारांमध्ये सुरक्षित अंंतर ठेवून कामाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.

कामगारांच्या जेवणाच्या वेळा या जेवणाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही यासाठी वेगवेगळ्या करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. उद्योग क्षेत्राला काही प्रमाणात बंधने मात्र पाळावीच लागणार आहेत.

उद्योजकांनी व कामगारांनी नियमांचे पालन करावे आपले व आपल्या कूटूंबाचे स्वस्त सूरक्षित करण्याचे आवाहन औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी केले.