पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करा: महापौर ताहेरा शेख

पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करा: महापौर ताहेरा शेख

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

पवित्र रमजान ईदच्या (Ramadan Eid) पार्श्वभूमीवर शहरातील नमाज पठणाच्या सर्व ईदगाह मैदानांच्या स्वच्छतेसह दैनंदिन साफसफाई (Cleaning) व पाणीपुरवठा (Water supply) सुरळीत ठेवण्याच्या सक्त सूचना महापौर ताहेरा शेख (Mayor Tahera Sheikh) यांनी संबंधित विभागप्रमुखांना केल्या.

3 ते 4 दिवसांपासून विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत जनतेत प्रचंड नाराजी असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने (Water Supply Department) काटेकोर नियोजन करावे, असेही त्यांनी सूचित केले.

आगामी रमजान ईदसह इतर सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विभागप्रमुखांच्या आढावा बैठकित (Review meeting) त्याबोलत होत्या. यावेळी आयुक्त भालचंद्र गोसावी (Commissioner Bhalchandra Gosavi) यांनी महापालिकेतील स्वच्छता, विद्युत, बांधकाम, अतिक्रमण (Encroachment) व इतर विभागप्रमुखांनी आपापल्या विभागांशी संबंधीत कामे न चुकता पार पाडावीत. कामात कोणतीही कुचराई अथवा हलगर्जीपणा करता कामा नये, असे आदेश दिले. शहरात रमजान ईदनिमित्त लष्कर ईदगाह (पोलीस कवायत मैदान), कल्लुशाह ईदगाह, ईमाम अहमद रजा ईदगाह, सैय्यद इजहार अशरफ ईदगाह, छोटी ईदगाह (कुंभारवाडा), खलिल हायस्कुल ईदगाह, बहेतूउलम ईदगाह, तजवीजूल कुराण ईदगाह, मुफ्ती आजम ईदगाह, मिल्लत मदरसा ईदगाह,

भिकन शाह ईदगाह, सनाउल्लानगर ईदगाह अशा एकुण 12 ईदगाह मैदानांवर नमाज पठण (namaj pathan) केले जाते. सदर ईदगाह मैदांनाची वार्ड स्वच्छता निरिक्षकांनी आपल्या अधिनस्त स्वच्छता विभागातील कर्मचार्‍यांकडून साफसफाई करून घ्यावी, शहरातील रस्ते (road), गटारी व नाल्यांची साफसफाई करावी, नमाज पठणाच्या दिवशी भटक्या जनावरांचा बंदोबस्त करावा, शहरातील कचरा नियमितपणे उचलण्यात यावा, पाणीपुरवठा विभागाने सण-उत्सव काळात दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा, सार्वजनिक बांधकाम विभागाने ईदगाह मैदानांची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात,

मलेरीया विभागाने नियमीत फवारणी करावी, विद्युत विभागाने प्रमुख मार्गावरील पथदीप सुरळीत सुरू राहतील याची दक्षता घ्यावी तसेच शहरातील सर्व पथदीप सुरळीत चालू ठेवावेत, उद्यान विभागाने ईदगाह मैदाने व प्रार्थनास्थळ परिसरातील गवत, झुडपे काढून त्वरीत साफसफाई करावी आदी सूचना आयुक्त गोसावी यांनी केल्या. बैठकीस माजी महापौर शेख रशिद, स्थायी समिती सभापती जफर अहमद, सभागृहनेते अस्लम अन्सारी, नगासेवक विठ्ठल बर्वे, सहाय्यक आयुक्त हेमलता डगळे, सचिन महाले, सुनिल खडके, अनिल पारखे, शहर अभियंता कैलास बच्छाव,

उपअभियंता एस.टी.चौरे, जयपाल त्रिभुवन, मुख्य अग्निशमन अधिकारी संजय पवार, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, प्रभाग अधिकारी श्याम बुरकूल, अब्दुल कादीर अब्दुल लतीफ, प्रभाग अभियंता सचिन माळवाळ, महेश गांगुर्डे, मंगेश गंवादे, विद्युत निरीक्षक संतोष अहिरे, आस्थापना पर्यवेक्षक अनिल कोठावदे, उद्यान अधीक्षक नीलेश पाटील, प्रमुख स्वच्छता निरीक्षक आनंदसिंग पाटील, एकबाल अहमद जान मोहंमद, वरिष्ठ लिपीक सुनिल खैरनार, रमाकांत धामणे, इरफान मो. अश्रफ, प्रणव जोशी, उदय अहिरे व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.