Photo Gallery : नाशिक @५ वाजता; सर्वत्र शुकशुकाट, पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त

Photo Gallery : नाशिक @५ वाजता; सर्वत्र शुकशुकाट, पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त

नाशिक | प्रतिनिधी

शहरासह जिल्ह्यात आज (दि १२) दुपारी बारा वाजेपासून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली आहे. शहरात पोलीस बंदोबस्त दुपारनंतर वाढविण्यात आल्यानंतर आता नागरिकांचीदेखील वर्दळ कमी झाल्याचे चित्र नाशिकमध्ये दिसून येत आहे...

अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व अस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत. सीबीएस, शालीमार, त्र्यंबकनाका, नवीन सीबीएस, टिळक वाडी, मेन रोड, रेड क्रॉस सिग्नल या परिसरात शुकशुकाट बघायला मिळाला.

ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त असून बॅरीकेडींग लाऊन पोलीस यंत्रणा ये-जा करणाऱ्यांची चौकशी करत आहेत. तसेच विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाईदेखील करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com