लासलगाव बाजार समितीत 'ब्रेक द चेन ची' कडक अंमलबजावणी

लासलगाव बाजार समितीत 'ब्रेक द चेन ची' कडक  अंमलबजावणी

लासलगांव । Lasalgoan

संपूर्ण राज्यात कडक लाॅकडाऊनची अंमलबजावणी होत असताना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये गुरुवारपासून ब्रेक द चैनची कडक अंमलबजावणी करण्यांत येतं आहे.

राज्य सरकारने दिलेल्या निर्णयानुसार येथील बाजार समिती मध्ये बाजार समितीच्या आवारात मुख्य प्रवेशद्वाराजवळ प्रत्येक घटकाची मास्क घालने थर्मल स्कॅनिंग ऑक्सी मीटर च्या साह्याने ऑक्सिजन लेवल तपासणी करण्यात आली. काही प्रमाणात लक्षणे आढळून आल्यास सदर व्यक्तीला प्रवेश नाकारण्यात येत आहे.

लिलाव प्रक्रिया सुरू असताना ट्रॅक्टरद्वारे सोडियम हायफो क्लोराइड ची फवारणी करण्यात आली. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी वेळोवेळी ध्वनिक्षेपकावरुन सूचना करण्यात येत आहेत.

लिलाव प्रक्रिया चालू असताना खरेदीदार व मालकांनीच वाहना जवळ उभे राहण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. बाजार समितीच्या प्रत्येक घटकासाठी जागोजागी हँडवॉश सॅनिटायझर उपलब्ध करण्यात आले होते.

दरम्यान लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती त सकाळच्या सत्रात लाल कांदा ७४६ वाहनातून १६०८८ क्विंटल कांद्याची आवक झाली असून लाल कांदा कमीत कमी ५०० जास्तीत जास्त ९४७रु तर सरासरी भाव ८०१ रु होता. तर ऊन्हाळ (गावठी) २४१ वाहनातुन५१६४ क्विंटल कांद्याची आवक झाली असून कमीत कमी भाव ५११ जास्तीत जास्त भाव १०४१ रु. तर सरासरी भाव १०२० रु होता.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com