सिन्नर शहरात लॉकडाऊनची कडक अंमलबजीवणी; ग्रामिण भागात मात्र वर्दळ सुरूच

सिन्नर शहरात लॉकडाऊनची कडक अंमलबजीवणी; ग्रामिण भागात मात्र वर्दळ सुरूच

सिन्नर । Sinnar (प्रतिनिधी)

करोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनची सिन्नर शहरात पहिल्याच दिवशी कडक अंमलबजावणी दिसून आली.

शहरातील व्यापार्‍यांनी आपली दुकाने स्वयंस्फुर्तीने बंद ठेवली. तर नागरिकांनी देखील विनाकारण बाहेर पडणे टाळल्याने सर्वत्र शांतता दिसून येत होती. शहरात पोलीसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विनाकारण तसेच विनामास्क फिरणारांवर पोलीसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली.

भाजी बाजारातील गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी सिन्नर नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांनी भाजीविक्रेत्यांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

शहरात प्रवेश करणार्‍या सर्व रस्त्यांवर पोलीसांकडून नाकाबंदी करण्यात आली आल्याने अत्यावश्यक काम असेल तरच नागरिकांना शहरात किंवा शहराबाहेर सोडण्यात येत होते.

दरम्यान, ग्रामिण भागात देखील लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र पोलीसांसह स्थानिक प्रशासनाच्या काहीशा दुर्लक्षामुळे सर्वत्र वर्दळ सुरूच असल्याचे दिसून आले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com