'त्या' नराधमास कठोर कारवाई करण्यात यावी; आदिम संघर्ष समन्वय समितीकडून निवेदन

'त्या' नराधमास कठोर कारवाई करण्यात यावी; आदिम संघर्ष समन्वय समितीकडून निवेदन
USER

पंचवटी | प्रतिनिधी | Panchavati

द किंग फाऊंडेशन (The King Foundation) संचलित ज्ञानपीठ गुरुकुल निवासी वसतिगृह (Hostel) आदिवासी मुलीवर (tribal girl) झालेल्या अत्याचार प्रकरणी

सखोल तपास व्हावा, व पीडितांना न्याय मिळवून देत त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन (Educational rehabilitation) करावे अशी मागणी आदिम संघर्ष समन्वय समितीची वतीने केली आहे. याबाबत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे (Legislative Council Deputy Speaker Dr. Neelam Gorhe) यांना लेखी स्वरूपात निवेदन (memorandum) देण्यात आले आहे.

निवेदनात काही मागण्या करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात न्यायालयात केस लढण्या करिता वरिष्ठ अनुभवी वकिल (lawyer) नियुक्त करावे. सदर घटनेत आता पावेतो अल्पवयीन मुलीवर (minor girl) अत्याचाराच्या ७ तर वेठबिगारीचा १ अशा गुन्हे नोंद केले असून पोलीसांनी अधिक सखोल चौकशी केली तर अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे निवेदनात म्हटले आहे.

हे निवेदन प्रभाकर फसाळे , योगेश रिंजर्ड, नवनाथ हुमन, शारदा प्रतीके, माया मोरे , मनिषा घांगळे यांनी डॉ. निलम गोऱ्हे यांना दिले आहे. या अत्याचार पीडित घटनेला आदिम संघर्ष समन्वय समिती वाचा फोडली. सदर प्रकरण हे जलदगती न्यायालय स्थापन करून चालवले जावे. यात अनुभवी वरिष्ठ वकिल नियुक्त करावे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com