मनपा आयुक्त अ‍ॅक्शन मोडवर; 'त्या' लाचखोर सेवकांवर कडक कारवाई

नाशिक मनपा
नाशिक मनपा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकरोड (Nashikroad) विभागात लाच (Bribe) घेताना पकडण्यात आलेले महापालिकेचे दोन्ही सेवकांवर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी निलंबनाची कारवाई केली आहे...

सायंकाळी याबाबत त्यांनी आदेश पारित केले. पोलिसांचे अहवाल आल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली. स्वच्छता निरीक्षक राजू निरभवणे व बाळू जाधव अशी निलंबित करण्यात आलेल्या सेवकांची नावे आहेत.

नाशिक मनपा
सुरगाणा : नाशिकचे 'काश्मीर', पाहा फोटो...

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात दोन्ही सेवक अडकले होते. या प्रकाराची आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी गंभीर दखल घेत दोघा लाचखोर सेवकांना निलंबित केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com