पक्ष संघटन मजबूत करा

पक्ष संघटन मजबूत करा

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची NCP ताकद वाढावी, यासाठी संघटना अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. बुथ कमिटया Booth Committee याच खऱ्या अर्थाने पक्षाची ताकद आहे. पक्ष ताकदीने बांधायचा असेल तर बुथ कमिटया सक्षम कराव्या. या बूथ कमिटयांच्या कार्यकर्त्यांची बैठक घ्या, त्या कमिटया कार्यरत कशा होतील यासाठी प्रयत्न करा,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील NCP State President Jayant Patil यांनी शहर पदाधिकाºयांना केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकीकरिता आतापासून कामाला लागण्याचे आदेशही त्यांनी दिले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नामदार पाटील तीन दिवसांपासून नाशिकच्या दौºयावर आहे. रविवारी (दि.३) जयशकंर फेस्टीवल हॉलमध्ये त्यांनी शहरातील प्रमुख पदाधिकारी, नेत्यांशी बंद दरबावाजाआड बैठक घेतली.

शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी प्रस्ताविकात शहराचा कामकाजाचा आढावा मांडला. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी भाजपाने जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर अन्याय करण्याचे काम केले. त्यांना अडकविण्याचा प्रयत्न केला. चुकीच्या पध्दतीने ईडीचा वापर भाजप करत असल्याचा आरोप यावेळी केला.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भाजपावर टिकास्त्र सोडत, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी शहरातील विविध सेलचा कामकाजाचा आढावा घेत, प्रत्येक सेल प्रमुखांशी वैयक्तीक संवाद साधला.

करोना काळात काय काम केले, पक्ष संघटन बांधणीसाठी आपण काय प्रयत्न करत आहात, बुथ कमिटया आदींबाबत विचारणा करत, महापलिका निवडणुकींबाबत असलेली मते जाणून घेतली. यात शहरातील बहुतांश पदाधिकारी, नेत्यांशी महापालिका निवडणुक स्वबळावर लढण्याची आग्रही मागणी केल्याचे समजते. स्वबळावर निवडणुक लढल्यास कार्यकर्त्यांना ताकद मिळेल अशी भावना पदाधिकाºयांनी व्यक्त केल्या. तर, काही पदाधिकाºयांनी आघाडी करण्याचाही सूर यावेळी लावला.

राष्ट्रवादी हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही तर शेतकरी, कष्टकरी, युवक, युवती, विद्यार्थी, महिला यांच्यासह सर्व घटकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारा पक्ष आहे. संघटनेच्या समस्या अनेक आहे. परंतू, प्रत्येकाने आपल्या पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी, असे आवाहन महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केले.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष सुरेश चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षना सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, प्रदेश पदाधिकारी, दिलीप खैरे, अर्जुन टिळे, माजी खासदार समीर भुजबळ, देविदास पिंगळे, माजी आमदार हेमंत टकले, पकंज भुजबळ, अपूर्ण हिरे, जयंत जाधव, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, अ‍ॅड. रविंद्र पगार, युवकचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, गौरव गोवर्धने, समाधान जेजुरकर, अनिता भामरे, संजय खैरणार, सचिन पिंगळे, गजानन शेलार, विष्णुपंत म्हैसधुणे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.