अडीच महिन्यांपासून पथदीप बंद

अडीच महिन्यांपासून पथदीप बंद

सिन्नर। अमोल निरगुडे sinnar

थकीत बिजबिलामुळे Electricity bills व जिल्हा परिषदेकडून निधी बंद Funds closed by Zilla Parishad झाल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील सगळ्याच गावांमधील पथदिप गेल्या अडीच महिन्यांपासून बंद पडले आहेत Street lights off . त्यामुळे गणेशोत्सव, नवरात्रोत्सवानंतर ग्रामीण भागात दिवाळीही अंधारात जाणार असल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागातील पथदिव्यांच्या वीजबिलासाठी यापूर्वी जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध होत होता. मात्र, शासन स्तरावरुन येणारा हा निधीच गेल्या अडीच महिन्यांपासून बंद झाला आहे. त्यामूळे ग्रामपंचायती विज बिल भरु शकल्या नाहीत. त्यामुळे पथदिव्यांचे थकीत वीजबिल लाखोंच्या घरात गेल्याने महावितरणकडून सर्व ग्रामपंचायतींच्या पथ दिव्यांना होणारा विज पुरवठा बंद केला आहे. त्याचा फटका बसून ही सर्व गावे अंधारात गेली आहेत.

ग्रामपंचायतींना येणारा निधी बंद झाल्याने आधीच पाणीपुरवठा योजनेच्या वीजबिलाच्या थकबाकीचा बोजा अंगावर असताना पथदिव्यांच्या वीज बिलांचीही त्यात भर पडली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीही हतबल झाल्याचे दिसत आहेत. पथदिप बंदच झाल्याने रात्रीच्या वेळी ग्रामीण भागात काळोख पसरला आहे. सणासुदीच्या पार्श्वभुमीवर नागरिकांना रात्रीच्या वेळी गावात फिरणेही भीतीदायक झाले आहे. पथदिव्यांच्या उजेडामुळे रात्रीच्या वेळी सुरक्षिततेची भावना वाटत असे. मागील काही दिवसांपासून अंधाराचा फायदा घेऊन चोरींच्या घटनेत वाढ झाली आहे.

नांदुरशिंगोटे परिसरातही पथदिप बंद असल्याने घरासमोर लावलेल्या दुचाकीं चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. पथदिपच बंद पडल्याने ग्रामीण भागातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशात महावितरणकडून थकित विजबील वसूलीसाठी घरघूती विज कनेक्शनसह रोहित्राचीही विज तोडली जात आहे. यामुळे शेतकर्‍यांना पिकांना पाणी देणेही मुश्किल होऊन बसले आहे. प्रशासनाने यावर तात्काळ तोडगा काढून दिवाळीच्या पार्श्वभुमीवर पथदिप व शेतकर्‍यांची विज तोडणी थांबवण्याची मागणी होत आहे.

150 रोहित्रांची वीज तोडली

महावितरणकडून दोन दिवसांत बिल वसुलीसाठी तालुक्यातील चक्क 150 रोहित्रांचा वीज पुरवठा खंडीत केल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. विहिरींना पाणी असूनही केवळ वीज पुरवठ्या अभावी शेतात उभ्या असलेली पिकेही हातातून जाण्याची भिती व्यक्त होत आहे. महावितरणकडून घरगूती ग्राहकांनाही कोरोना काळात अव्वाच्या सव्वा बिलाची आकारणी केल्याने ग्राहकही वीज बिल भरण्याकडे कानाडोळा करत असून ऐन सणा-सुदीच्या काळात सर्वसामान्यांनाही अंधारातच रहावे लागणार असल्याचे जाणवू लागले आहे.

लवकरच तोडगा निघेल

करोनाच्या पार्श्वभुमीवर ग्रामीण भागातील पथदिव्यांसाठी जिल्हा परिषदेकडून येणारा निधी थांबला असून थकीत विज बिलामुळे महावितरणकडून पथदिव्यांचा विज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. ग्रामपंंचायत प्रशासन एवढे विजबिल भरण्यास असमर्थ असून शासनस्तरावर लवकरच यावर तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे.

मधुकर मुरकुटे, गटविकास अधिकारी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com