शेतीचा वीजपुरवठा सुरळीत करा : डॉ. पवार

शेतीचा वीजपुरवठा सुरळीत करा : डॉ. पवार

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

तालुक्यातील माळमाथा व काटवनसह इतर भागात अलीकडे वीजपुरवठ्याच्या (Power supply) तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या असून विशेषत: शेतकरी (farmres) संत्रस्त झाले आहेत.

यास्तव शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठनेते डॉ. जयंत पवार (Senior NCP leader Dr. Jayant Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) व ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Energy Minister Dr. Nitin Raut) यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

मालेगाव तालुका (malegaon taluka) भागात वारंवार वीजपुरवठा खंडीत (Power outage) होत असल्यामुळे शेतीपिकांचे नुकसान होत आहे. वळवाडे, पोहाणे, सावतावाडी, वडनेर, खाकुर्डी, अजंग, वडेल या भागातील शेतकर्‍यांनी नुकतेच वीज उपकेंद्रांवर मोर्चे काढून आंदोलने (agitation) केली. मात्र, त्याची दखल महावितरणने (MSEDCL) घेतली नाही. डाबली परिसरात रात्रीच वीजपुरवठा करण्यात येतो.

मात्र, या भागात बिबट्याचा मुक्तसंचार असल्यामुळे शेतकर्‍यांना रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून पिकांना पाणी देण्यास जावे लागते. बिबट्याच्या दहशतीमुळे अनेक शेतकरी रात्री शेतशिवारात जाणे टाळतात. त्यामुळे पिकांचे नुकसान होते. यास्तव दिवसा वीजपुरवठा करावा, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. वीजेचा लपंडाव व कमी-अधिक दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे शेतीपंप जळण्याचे प्रमाण वाढले असून याबाबत तक्रार करणार्‍या शेतकर्‍यांना अधिकारी अरेरावी करतात.

महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकर्‍यांना त्रास सहन करावा लागत असल्याने आपण व्यक्तिशः लक्ष घालून तालुक्यात शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा होण्यास मदत करावी, अशी मागणी डॉ. पवार यांनी निवेदनाच्या शेवटी केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com