गावंधपाडा येथे पसरली स्ट्रॉबेरीची लाली..!

स्ट्रॉबेरीचा पहिलाच प्रयोग
गावंधपाडा येथे पसरली स्ट्रॉबेरीची लाली..!

दिंडोरी । Dindori

पिढ्यान पिढ्या भात, नागलीसारख्या पारंपारीक पिकांवर आपल्या कुटूंबाची आर्थिक गुजराण करणार्‍या गावंधपाडा येथील तरुण शेतकर्‍याने आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची कास धरत स्ट्रॉबेरी उत्पादनाचा पहिलाच प्रयोग यशस्वी केला असून, आता पेठ तालुक्याच्या डोंगराळ भागातही स्ट्रॉबेरीची लाली पसरली आहे.

गावंधपाडा येथील श्रीमंत धरण क्षेत्रात वडिलोपार्जित शेती असलेले रवींद्र वाघमारे व एकनाथ वाघमारे या सुशिक्षित व शेतकर्‍यांनी तालुका कृषी विभागाच्या विकेल ते पिकेल या अभियानांतर्गत मार्गदर्शन घेऊन स्वत: च्या अडीच एकर शेतात स्ट्रॉबेरीची लागवड केली.

तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे, करंजाळी मंडल कृषी अधिकारी मुकेश महाजन, कृषी सहाय्यक रणजित आंधळे आदींचे मार्गदर्शन घेत वाघमारे यांनी स्टॉबेरीची शेती फुलवली असून, उत्पादनही सुरु झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com