स्ट्रॉबेरी बनली आदिवासींच्या उत्पादनाचे साधन

80 ते 100 रुपये किलो दराने विक्री
स्ट्रॉबेरी बनली आदिवासींच्या उत्पादनाचे साधन

कळवण। प्रतिनिधी Kalwan

कळवण तालुक्यात (kalwan taluka) पारंपरिक शेतीने (Traditional farming) कात टाकायला सुरुवात केली असून तालुक्यातील पश्चिम भागात द्राक्षाबरोबरच स्ट्रॉबेरीची (Strawberry) लागवड मोठया प्रमाणात होतांना दिसत आहे.

सध्या स्ट्रॉबेरीचे दर 80 ते 100 रुपये किलो असून तालुक्यातील पश्चिम भागातील आदिवासी बांधवाना (Tribal community) हे पीक वरदान ठरले आहे. स्ट्रॉबेरीची ग्राहकांना भुरळ पडली आहे. कळवण तालुक्यातील पश्चिम भागातील सुकपूर, पळसदर, देवळी, बिलवाडी, जमलेवणी, खिराड, तिरहळ, देसगाव, बंदीपाडा, वडाळा, लिंगामा, आमदर, देवलीकर्‍हाड, मोहपाडा, निरगुडपाडा, वडपाडा,

आदी गावांमध्ये स्ट्रॉबेरी पिकांची (Strawberry crop) लागवड मोठया प्रमाणावर होत असल्याची माहिती देवीदास बागुल, काळू गायकवाड, केदा चव्हाण या शेतकर्‍यांनी दिली. दोन एकर क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड केली असता त्यांना 2 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले त्यातून लागवड, खते, औषधे, असा सर्व खर्च फक्त 60000 रुपये येतो व ते जाऊन दीड लाख रुपये नफा मिळतो.

सात महिन्यात स्ट्रॉबेरीचे उत्पन्न मिळत असून आदिवासी शेतकर्‍यांना द्राक्षाबरोबरच स्ट्रॉबेरी पीक एक आर्थिक प्राप्तीचे साधनच बनले आहे. एका वर्षात निव्वळ खर्च जाऊन 1 लाख रुपये निव्वळ नफा मिळतो. अर्धा एकरात 75000 रुपयांचे स्ट्रॉबेरीचे उत्पन्न मिळते. सात ते आठ महिन्यात उत्पादन सुरू होऊन 80 ते 100 रुपये किलो दराने विक्री केली जाते.

काळीभोर सुपीक जमीन (Fertile land) व मुरबाड जमीन या दोन्हीपैकी कोणत्या जमिनीत स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतल्यावर काय फरक जाणवतो असे विचारले असता मुरबाड जमिनीत स्ट्रॉबेरीचे उत्पादन लवकर चालू होते तर सुपीक जमिनीत 8 ते 9 महिन्यात उत्पादन सुरू होते. अंदाजे एक एकर क्षेत्रात स्ट्रॉबेरीचे उत्पन्न एक टन 500 किलो निघते व त्या स्ट्रॉबेरीची विक्री अहमदाबाद, मुंबई, हैदराबाद, सुरत, बडोदा, या ठिकाणी होते.

स्वतःच्या वाहनाने किंवा भाड्याच्या वाहनाने या।ठिकाणी स्ट्रॉबेरी विक्रीसाठी तिथे 125 ते 150 रुपये किलो भाव मिळतो. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठया प्रमाणावर फायदा होतो. त्यामुळे शेतकरी व्यापार्‍यांना न देता स्वतःच विक्रीसाठी नेणे पसंद करतात कळवण तालुक्यातील छोट्या मोठ्या गावांमध्ये 80 ते 100 रुपये किलोने स्ट्रॉबेरीची विक्री होते. स्ट्रॉबेरीसाठी रोपांची लागवड केल्यानंतर थंडीमुळे रोपे करपू नयेत व अळी पडू नये यासाठी दर 15 दिवसांनी औषधे फवारणी करावी लागते.

स्ट्रॉबेरी साठी एकोमाईट, निराकोबी, विविध पावडरी, रोगेल, 19-19 ची खते, लिक्वीड, 15 - 15 ची खते वापरावी लागतात. सुरुवातीला फक्त एका वेळेला स्ट्रॉबेरला युरियाचा डोस द्यावा लागतो. तांबट मुरबाड जमीन असो स्ट्रॉबेरीचे पीक कुठल्याही जमिनीत घेता येते. स्ट्रॉबेरी पिकासाठी मजूर जास्त लावावे लागतात. परंतू इतर पिकानांपेक्षा स्ट्रॉबेरीचे उत्पादन चांगले मिळते. भावाच्या बाबतीत तुलना केल्यास हे पीक द्राक्षाबरोबरच आथिर्क दृष्ट्या उत्पन्न देणारे आणि परवडणारे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com