इंधन दरवाढीमुळे पुन्हा पेटल्या चुली; सिलिंडर महागल्याने शेगड्या धुळ खात

इंधन दरवाढीमुळे पुन्हा पेटल्या चुली; सिलिंडर महागल्याने शेगड्या धुळ खात

शिरवाडे वणी । वार्ताहर | Shirwade Vani

केंद्र शासनाने (central government) घरगुती गॅस सिलेंडरच्या (Domestic gas cylinder) दरात मोठी वाढ (Rate increase) करून सिलेंडरवर मिळणारे अनुदान (subcidy) देखील

बंद झाल्याने ग्रामीण भागात (rural area) गॅस टाकीसह शेगडी (grate) आता धुळखात पडू लागली असून गरीबांच्या घरात पुन्हा चुली पेटू लागल्या आहे. ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखवणार्‍या सरकारने पुन्हा एकदा चुलीला ‘अच्छे दिन’ आणले आहे.

मागील पाच वर्षाच्या कालावधीकडे दृष्टीक्षेप टाकला असता दररोजच्या जीवनामध्ये स्वयंपाकासाठी लागणारा एलपीजी गॅस सिलेंडरला (LPG gas cylinder) आता 1100 रुपये मोजावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसताना दिसत आहे. पूर्वीच्या काळी जंगलातून अथवा रानातून लाकडे गोळा करून आणल्यानंतर चुलीवर होणार्‍या स्वयंपाकाची (cooking) चव आता पुन्हा एकदा जिभेला गोडी लावताना दिसत आहे.

तर थंडीच्या (winter) दिवसात घरात उष्णता तयार करून चुलीच्या झालेल्या धुरामुळे घरांमध्ये डासांचे (mosquitoes) प्रमाण देखील कमी राहत होते व चुली मधील जळालेल्या लाकडांच्या विस्तवांपासून राख देखील मिळत असून त्याचा अधिकाधिक फायदा देखील लोकांना होत असे. घरगुती स्वयंपाकासाठी लागणार्‍या गॅसच्या किमती वाढत असल्यामुळे ग्राहकांच्या कपाळावर आढ्या निर्माण होत आहे. त्यामुळे गोरगरीब जनता आधीच महागाईने (inflation) होरपळून निघालेली असतांना गॅसची दरवाढ ही ग्राहकांना आता चांगलीच सतावत आहे.

घरगुती स्वयंपाकासाठी लागणार्‍या गॅस सिलेंडरची (Gas cylinder) किंमत ज्यावेळेस 600 रुपये असताना अडीचशे रुपये शासनाकडून सवलत मिळत होती त्यावेळी ग्राहकांच्या चेहर्‍यावर काहीसे समाधान दिसून येत होते. परंतु काही दिवसांपासून या सवलती बंद झाल्यामुळे तसेच किमतीमध्ये अजून वाढ झाल्यामुळे स्वयंपाकासाठी लागणारा गॅस आता ग्राहकांना परवडेनासा झाला आहे. परिणामी ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. चुलीवर केलेल्या स्वयंपाकामुळे इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत होत असल्यामुळे घरगुती स्वयंपाकासाठी लागणार्‍या गॅसची किंमत पाहता ग्राहकांना चक्कर येणे साहजिकच आहे.

काही वर्षांपूर्वी घरगुती स्वयंपाकासाठी लागणार्‍या गॅस सिलेंडरच्या (Gas cylinder) किमती खूप कमी असल्यामुळे गॅस विक्रेत्यांनी ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर गॅस विक्री करून जणू मोहातच पाडले होते. सरकारने देखील गरीब लोकांना अत्यल्प दरात गॅस कनेक्शन (Gas connection) नावावर करून गॅस ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणावर फक्त वाढवून घेतल्याचे दिसून येत आहे. तसेच अनुदान (subcidy) मिळणार आहे या आशेवर बँकेमध्ये खाते उघडून ग्राहकांची फक्त दिशाभूल करण्यात आल्याचे ग्राहकांनी म्हटले आहे.

एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG gas cylinder) झालेल्या दरवाढीमुळे गॅस ग्राहकांची नाराजी दिसून येत आहे. तसेच पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी गॅस ची किंमत देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याचा फटका जिवनावश्यक वस्तूंना मोठ्या प्रमाणात बसुन सर्वच वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. शासन एकीकडे महागाई आटोक्यात आणण्याची घोषणा करते तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेल, गॅस वाढीने ट्रान्सपोर्टचा खर्च वाढतो. त्यात जीएसटी ची अधिक भर पडते. त्यामुळे वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून सरकारच्या पोकळ आश्वासनांमुळे सर्वसामान्यांचे मोठे हाल होतांना दिसत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com