सुरगाणा : सांबरखल येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडाले

केसर आंब्याचे नुकसान
सुरगाणा : सांबरखल येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडाले

हतगड | Hatgad

सुरगाणा तालुक्यातील आज सकाळ पासून सुरु असलेल्या तोक्ते संबरखाल येथील शाळेला वादळाचा जोरदार तडाखा बसला. यात शाळेचे पत्रे पूर्ण उडाले असून एका बाजूची भिंत कोसळली आहे.

दरम्यान कालपासून जिल्हाभरात तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम जाणवत आहे. सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊसही बरसतो आहे. अशातच आज सकाळी सातच्या सुमारास जिल्हा परिषद शाळा सांबरखल येथे शाळेला जोरदार तडाखा बसला. येथील चार वर्ग खोल्यांचे पत्रे जोरदारपणे आलेल्या वादळात उडाले असून पत्र्यांचा अगदीच चेंदामेंदा झाला आहे.

हेच पत्रे समोरील एक वर्ग खोली असलेल्या कौलारू इमारत व मंदिरावर पडल्याने कौलाचे नुकसान झाले आहे.

तर गुलाबी गाव म्हणून ओळख असलेल्या भिंतघर येथे चक्रीवादळात आंबा फळबागांचे नुकसान झाले असून केशर, पायरी, हापुस, राजापुरी, तोतापुरी आदी आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com