महानगरी, गोरखपूर, कामयानी एक्स्प्रेसची 'ही' सेवा होणार पूर्ववत

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

करोनामुळे (Corona) लॉकडाऊनच्या काळात रेल्वे (Railway) प्रशासनाने अनेक रेल्वे गाड्यांचे थांबे रद्द केले होते. त्यात महानगरी (Mahanagari), गोरखपूर (Gorakhpur) व कामयानी एक्स्प्रेस (Kamayani Express) या गाड्यांचा नांदगाव (Nandgaon) व लासलगाव (Lasalgaon) येथील थांबा रद्दचादेखील समावेश होता...

परंतु आता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या रेल्वे गाड्यांचा नांदगांव व लासलगाव येथील थांबा मंजूर केला असून 14 ऑगस्ट पासून या थांब्यांवर वरील रेल्वेसेवा पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी दिली आहे.

लोकमान्य टिळक गोरखपुर एक्सप्रेस (15017/18) व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते वाराणसी महानगरी एक्सप्रेस (22177/78) तसेच लोकमान्य टिळक टर्मिनल्स वाराणसी कामयानी एक्सप्रेस (11071/72) या रेल्वे गाड्यांचे नांदगाव व लासलगाव येथील थांबे रद्द केल्याने नियमितपणे रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी, सरकारी, निमसरकारी कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती.

संग्रहित छायाचित्र
नाशकात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

प्रवाशांची ही गैरसोय लक्षात घेवून करोनाकाळात नांदगाव व लासलगाव येथील रद्द करण्यात आलेले रेल्वे थांबे 14 ऑगस्टपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी सतत पाठपुरावा करतांना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे सहकार्य लाभले आहे.

14 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सेंट्रल रेल्वेचे महाप्रबंधक यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवला जाणार असल्याचेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले आहे.

संपूर्ण भारतात करोना काळात विविध स्थानकांचे थांबे रद्द करण्यात आले होते. परंतु करोना परिस्थिती जस जशी पूर्वपदावर येत आहे व प्रवासी संख्येचा विचार करुन भारतीय रेल्वे प्रशासनाने करोना काळात बंद करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या व रद्द केलेले थांबे पुन्हा पुर्ववत करण्यास सुरूवात केली आहे.

संग्रहित छायाचित्र
स्वातंत्र्यदिनाला ध्वजारोहणाचा प्रश्न सुटला; नाशिकसह १९ जिल्ह्यांत 'हे' मंत्री करणार ध्वजारोहण

नांदगाव व लासलगाव येथील रेल्वे थांबे मंजूर झाल्याने नाशिक जिल्ह्यातील निफाड, नांदगाव, लासलगाव, मनमाड यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारच्या (Central Government) सेवा सुशासन आणि गरीबांचे कल्याण या त्रिसुत्री मुलमंत्रानुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) व राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी रेल्वे सेवा अधिक सुखर केल्याबद्दल डॉ. भारती पवार यांनी आभार मानले. पुर्ववत रेल्वे सेवेचा जास्तीत जास्त प्रवाशांनी नियमित संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहनही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी केले आहे.

संग्रहित छायाचित्र
सांगा जगायचं तरी कसं? शेतात चार फुट पाणी, पावसानं सर्व काही हिरावून नेलं, पाहा व्हिडीओ...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com