टोल बंद करा; प्रहारचे निवेदन

टोल बंद करा; प्रहारचे निवेदन

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

शिंदे (shinde) येथील टोल नाक्याच्या (Toll Naka) माध्यमाने तालुक्यातील व नाशिक (nashik) परिसरातील जनतेची लूट होत असल्याचा आरोप करीत प्रहार जनशक्ती पक्षाने (Prahar Janashakti Paksh) हा टोल नाका बंद करण्याची मागणी केली. याबाबत तहसीलदार राहुल कोताडे (Tehsildar Rahul Kotade) यांना निवेदन (memorandum) देण्यात आले.

नियमाची पायमल्ली करुन बेकायदेशीर टोल वसुली (Illegal toll recovery) केली जात आहे. त्यामुळे हा टोल नाका त्वरित बंद करुन टोल कंपनी व संबंधित अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनात (memorandum) करण्यात आली आहे. रस्त्याच्या आजूबाजूला पर्यावरणाचा र्‍हास झालेला आहे. संबंधित कंपनीने पर्यावरणाचे संवर्धन केलेले नाही. टोल परिसरात असलेल्या शौचालयाची साफसफाई होत नाही. पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचा बोर्ड दर्शनी भागात लावण्याची व्यवस्था करावी अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

15 दिवसांत सकारात्मक निर्णय न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्कप्रमुख दत्तू बोडके, जिल्हाध्यक्ष शरद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायधनी, कामगार संघटना जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर ढोली, उपाध्यक्ष कमलाकर शेलार, तालुकाध्यक्ष कैलास दातीर, युवा तालुकाध्यक्ष विलास खैरनार, शहराध्यक्ष खंडू सांगळे, संदीप हळकुंडे, सदाशिव बिन्नर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

रस्त्याच्या कामाची चौकशी व्हावी

शिंदे टोलपासून सिन्नरपर्यंत रस्त्यावर खड्डे पडत असून पुलाचे काम निकृष्ट, दर्जाहीन झालेले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्याने दुचाकीधारकांचे अपघातही झाले आहेत. पुलांला तडे गेले असून या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.