कांद्याची घसरण थांबवा; प्रहार जनशक्तीतर्फे निवेदन

कांद्याची घसरण थांबवा; प्रहार जनशक्तीतर्फे निवेदन

सटाणा । प्रतिनिधी | Satana

कांदा उत्पादन खर्च (Onion production costs) व बाजारभाव यातील तफावत अनुदान (Grants) स्वरूपात शासनाने शेतकर्‍यांना (farmers) द्यावी.

तसेच नाफेडचा खरेदी केलेला कांदा (onion) व शेतकर्‍यांना मिळालेला भाव याची सखोल चौकशी करण्यासह कांद्याच्या दराची होत असलेली घसरण त्वरीत थांबवावी आदी विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या (Prahar Janashakti Paksha) बागलाण तालुका (baglan taluka) आघाडीतर्फे तहसीलदारांना निवेदन (memorandum) देण्यात आले.

कांद्यास मिळत असलेला अत्यल्प भाव शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या उध्वस्त करणारा ठरत असल्याने या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्तीतर्फे आज तहसीलदारांची (Tehsildar) भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन (memorandum) सादर करण्यात आले. या निवेदनात शेतकर्‍यांचे प्रलंबित अनुदान त्वरित अदा करावे, पिकविमे (Crop insurance) पंचनाम्यानुसार अदा करण्यात यावे, खते आणि बियाणे यांच्या तक्रारीसाठी टोल फ्री शासन क्रमांक (Toll-free governance number) जाहिर व्हावा आणि तक्रार चोवीस तासाच्या आत निकाली काढावी अशा मागण्या केल्या गेल्या.

प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर (District President of Prahar Janshakti Party Ganesh Nimbalkar) यांच्या मार्गदर्शनाने बागलाण तालुकाध्यक्ष गणेश काकुळते यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकर्‍यांच्या उपस्थितीत नायब तहसीलदार बहिरम व पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

शासनाने शेतकर्‍यांच्या सहनशीलतेचा अंत न बघता कांदा प्रश्नी बाजार भावाबाबत ठोस पावले उचलावीत अन्यथा जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालयावर मोठ्या संख्येने येऊन घेराव घालत डेरा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काकुळते यांनी दिला. यावेळी गणेश काकुळते, अरुण देवरे, धनंजय पवार, राजेंद्र अहिरे, पवन सावकार, मनोज देवरे, भारत सोनवणे, नंदू देवरे, रोशन अहिरे , सोपान ठाकरे, शरद गुंजाळ, दिपक खरे, प्रकाश देवरे, विशाल पाटील यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com