समृध्दीची अवजड वाहतूक थांबवा

नागरिकांची मागणी; पोलीस निरीक्षक कोते यांची मध्यस्थी
समृध्दीची अवजड वाहतूक थांबवा

वावी । Vavi (वार्ताहर)

समृद्धी महामागाच्या वजनदार वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांची चाळण झाल्या आहे. येथील काही तरुणांनी वावी - पिंपरवाडी रस्त्यावर चालणार्‍या वजनदार वाहनांना मज्जाव केल्याने संबंधित ठेकेदाराने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता सहा.पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी मध्यस्थी करत ठेकेदार व शेतकरी यांच्यात मध्यस्थी केली.

सध्या मुंबई नागपुर एक्स्प्रेस हायवेचे काम झपाट्याने सुरू असून हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर तसेच ठेकेदाराकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र ड्रीम प्रोजेक्ट तयार करताना स्थानिक रस्त्यांची मात्र चाळण झाल्याचे दिसून येत आहे. समृद्धी महामार्गानजीक सिन्नर तालुक्यातील गावांमधून मुरूम माती काढण्याचे काम सुरू आहे. या करिता संबंधित ठेकेदाराने स्वबळावर स्थानिक शेतकर्‍यांच्या जमिनी मुरूम काढण्याकरिता विकत घेतल्या आहेत.

मात्र संबंधित ठेकेदाराने ज्या रस्त्याची क्षमता नसलेल्या रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त वजनदार वाहनांची वाहतूक करून रस्त्यांची चाळण केली आहे. याबाबत येथील शेतकर्‍यांनी ठेकेदारास विचारणा केली असता ठेकेदाराकडून अरेरावी केल्याचा प्रकार दिसून आला. रात्रीच्या वेळी वावी - पिंपरवाडी रस्त्यावर अंदाजे 25 ते 30 मोठे डंपर मुरूम वाहतूक करत असल्याने रस्त्यानजीक असणार्‍या शेतकर्‍यांची रात्रीची झोप उडत आहे.

वाहनांवरील काही वाहन चालक मद्य प्राशन करून वाहने चालवीत आहे. समोरून येणार्‍या शेतकर्‍यांची जनावरे, वाहने यांना जाणीव पूर्वक त्रास देण्याचे काम या वाहनचाकलांकडून सुरू आहे. यामुळे येथील काही शेतकर्‍यांनी या ठेकेदाराच्या वाहनांची अडवणूक करून त्यांना सूचना केल्या.

मात्र ठेकेदाराकडून अरेरावी होत असल्याने यात वावी पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी येथील शेतकरी व संबंधित ठेकेदार यांना समज देत या रस्त्यावर मुरूम वाहणार्‍या वाहनांची संख्या अवघी पाच ते सहा ठेवावी.

जेणे करून या रस्त्याची आणखी दुरवस्था होणार नाही व झालेल्या रस्त्यावर मुरूम टाकून वाहतूक करावी अशी सूचना केली. यावेळी येथील नागरिक प्रदीप दुबे, दिपक वेळजाळी, संदीप ताजणे, अभिजित ताजणे,पप्पू शिंदे,सोपान शिंदे उपस्थित होते.

यापुर्वी वावीचे सहायक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या कार्यकाळात देखील याच मुद्यावरून मागील वर्षी संबंधित ठेकेदारास सूचना केल्या होत्या. मात्र पोलीस निरीक्षक कोते यांनी केवळ शेतकर्‍यांना सुचना करता या रस्त्याची परिस्थिती समजून घ्यावी. नशा करून वाहन चालविणार्‍या वाहन चालकावर कारवाही करावी व समृद्धी महामार्गाच्या ठेकेदारांची पाठराखण करू नये.

दिपक वेळजाळी, नागरिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com