व्हॉट्सअप ग्रुपवर प्रशासकीय आदेशांचा भडीमार थांबवाः वडजे

व्हॉट्सअप ग्रुपवर प्रशासकीय आदेशांचा भडीमार थांबवाः वडजे

दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori

प्रशासकीय व्हाट्सअप ग्रुप (Administrative Whatsapp Group) वर वारंवार दिल्या जाणार्‍या सूचना व आदेशांमुळे शिक्षकांचे मानसिक स्वास्थ्य (Mental health of teachers) बिघडत असून

प्रशासनाने व्हाट्सअपचा (Whatsapp) कार्यालयीन वेळेत व मर्यादित वापर करावा अन्यथा येत्या शिक्षक (teacher) दिनापासून प्रशासकीय व्हाट्सअप ग्रुप वर बहिष्कार घालण्यात येईल असा इशारा शिक्षक संघाच्या (Teachers Unions) त्रैमासिक सभेत तालुकाध्यक्ष सचिन वडजे यांनी दिला.

सचिन वडजे पुढे म्हणाले की, करोना (corona) काळातील शैक्षणिक नुकसान (Educational loss) भरून काढण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये (students) उपस्थित असणे अत्यावश्यक आहे मात्र विविध उपक्रम व अनावश्यक कार्यक्रम राबवून शिक्षकांना प्रत्यक्ष अध्यापनापासून दूर ठेवले जात आहे. त्यामुळे विद्यार्थी गुणवत्तेवर देखील परिणाम होत आहे. शिक्षकांना व्हाट्सअप (Whatsapp) द्वारे विविध आदेश व सूचना देण्यात येतात. रात्री अपरात्री मेसेज पाठवून विविध माहित्या मागितल्या जातात.

सुट्टीच्या दिवशी किंवा रविवारी सुद्धा झूम मीटिंग (Zoom meeting) आयोजित करण्यात येतात. विविध माहितीची लिंक तात्काळ भरून मागितली जाते. सेतू उपक्रम, पोषण आहार (Nutritional diet) पाच वर्षाचे ऑडिटची माहिती जमा करणे, सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेची माहिती देणे, गणवेश माहिती, अध्ययन स्तर निश्चिती, बांधकामांच्या माहित्या,

विविध खात्यांचे लेखापरीक्षण (audit), विद्यार्थी आधार कार्ड (Student Aadhaar Card), ऑनलाईन शालेय कामे, शालेय उपक्रम, विविध समित्यांचे कामकाज, शालेय रेकॉर्ड अद्यावत ठेवणे, वारंवार होणार्‍या शिक्षण परिषदा, टॅग मिटींग यामध्ये शिक्षकांचा प्रचंड वेळ खर्च होत असून प्रत्यक्ष अध्यापनासाठी कमी वेळ उपलब्ध होत असल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे.

या सर्व सूचना प्रशासकीय व्हाट्सअप ग्रुप (Whatsapp group) वर वारंवार दिल्या जात असल्याने व्हाट्सअपचा कामापूरता मर्यादित वापर करून कार्यालयीन वेळेतच महत्त्वाचे मेसेज किंवा सूचना द्याव्यात अशी शिक्षकांची अपेक्षा (Expectations of teachers) असून यामध्ये प्रशासनाने योग्य तो बदल करावा अन्यथा येत्या शिक्षक (teachers) दिनापासून सर्व प्रशासकीय व्हाट्सअप ग्रुप वर बहिष्कार घालण्यात येईल व सर्व शिक्षक ह्या सर्व ग्रुपमधून बाहेर पडतील असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर विभागीय सरचिटणीस प्रमुख शिरसाठ, राज्य सदस्य प्रदीप मोरे, जिल्हा नेते धनंजय आहेर, तालुका नेते धनंजय वानले, जिल्हा पदाधिकारी नंदकुमार गांगुर्डे, एन. जे. आहेर, भाऊसाहेब बिरारी, चंद्रशेखर मोरे, परसराम चौरे, दगडू खैरनार, रमेश देसाई आदी उपस्थित होते. सरचिटणीस योगेश बच्छाव यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. शिक्षक संघाच्या सेवानिवृत्त सभासद माजी केंद्रप्रमुख चंद्रशेखर मोरे, माजी केंद्रप्रमुख परसराम चौरे, दगडू खैरनार, रमेश देसाई यांचा व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तालुका कार्याध्यक्षपदी किरण शिंदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही पदाधिकार्‍यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. शिक्षक संघाने डीटीपीएल क्रिकेट स्पर्धा यशस्वी आयोजित केल्याबद्दल नियोजन समिती प्रमुख प्रवीण वराडे, गणेश बोरसे यांचा तालुका शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला. दिंडोरी तालुक्यातील शिक्षिकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवणार्‍या महिला आघाडी अध्यक्षा अमिता सोनवणे, जिल्हा प्रतिनिधी पुष्पा डावरे, कार्याध्यक्ष रत्नमाला गाजरे तसेच महिला कार्यकारिणीचा सत्कार संपन्न झाला.

शिक्षकांच्या साहित्याला हक्काचे व्यासपीठ मिळवून देणार्‍या मासिक शिक्षक मित्रचे कार्यकारी संपादक सुनील पेलमहाले, सहसंपादक नौशाद शेख, उपसंपादक श्रावण भोये, यांच्यासह संपूर्ण संपादक मंडळाचा सत्कार यावेळी पार पडला. यावेळी तालुक्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सेवापुस्तक शिबिर, निवड श्रेणी, चटोपाध्याय वेतनश्रेणी, फरक बिले,वैद्यकीय बिले,डीसीपीएस हिशोब त्रुटी, बहिस्थ परवानगी, एकस्तर वेतन श्रेणी, फंड प्रकरणे, गोपनीय अहवाल, पगार वेळेत होणे, अशैक्षणिक कामे बंद करणे आदी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

या विषयावर प्रशासनाला निवेदन देऊन विशिष्ट मुदतीत प्रश्न न सुटल्यास कायदेशीर मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल अशीही भूमिका सर्वानुमते ठरवण्यात आली. यावेळी शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष प्रदीप शिंदे यांनी त्रैमासिक सभेस सदिच्छा भेट देऊन शिक्षक संघ दिंडोरी कार्यकारिणीच्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस योगेश बच्छाव यांनी केले तर आभार संपर्कप्रमुख प्रवीण वराडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिंडोरी तालुका संघाचे पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com