राज्याबाहेर कांदा बियाणे विक्रीसाठी बंदी घालावी
नाशिक

राज्याबाहेर कांदा बियाणे विक्रीसाठी बंदी घालावी

राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे विभागीय कृषी सहसंचालक यांना पत्र

Vijay Gite

Vijay Gite

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र राज्यामध्ये उत्पादित झालेले खाजगी कंपण्यांचे बियाणे हे प्राधान्यक्रमाने महाराष्ट्रातीलच कांदा उत्पादकांना विक्री करावेत.तसेच संबंधित कांदा बियाणे उत्पादक कंपन्यांना राज्याबाहेर कांदा बियाणे विक्रीसाठी संपूर्ण बंदी घालावी,अशी मागणी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने विभागीय कृषी सहसंचालक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मागील वर्षी अतिवृष्टीमुळे आणि नंतरचे खराब हवामान यामुळे महाराष्ट्रामध्ये खरीप व रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या कांदा बियाण्याचा उतारा कमी येत आहे. यामुळे कांदा उत्पादकांना लाल व उन्हाळ कांद्याच्या बियाण्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत आहे.अशा परिस्थितीत परराज्यात कांदा बियाणे विक्रीसाठी जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

त्यामुळे राज्यामध्ये उत्पादित झालेले खाजगी कंपण्यांचे बियाणे हे प्राधान्यक्रमाने महाराष्ट्रातीलच कांदा उत्पादकांना विक्री करावे व संबंधित कांदा बियाणे उत्पादक कंपन्यांना राज्याबाहेर कांदा बियाणे विक्रीसाठी संपूर्ण बंदी घालावी, तसेच राज्यातील कांदा उत्पादकांना खाजगी कांदा बियाणे उत्पादक कंपन्यांनी हे कांदा बियाणे चढ्या दराने विक्री न करता माफक दरात उपलब्ध करून द्यावे.

यासाठी कृषी विभागाने तातडीने लक्ष घालावे , अशा मागणीचे पत्र महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे व प्रवक्ते शैलेंद्र पाटील यांनी विभागीय कृषी सहसंचालक सुनिल वानखेडे यांना दिले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com