
कसबे सुकेणे। वार्ताहर Kasbe Sukene
थकीत वीजबिल (Exhausted electricity bill) प्रकरणी शेतकर्यांच्या कृषीपंपाचा (Agricultural pump) वीजपुरवठा (Power supply) खंडित करु नये अन्यथा त्याबाबत तीव्र आंदोलन (Movement) छेडण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेच्या (shetkari sanghatna) वतीने आमदार दिलीप बनकर (mla dilip bankar) यांना दिलेल्या निवेदनाद्वारे (memorandam) देण्यात आला आहे.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्यांच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वीजवितरण कंपनीकडून शेतीपंपासाठी फक्त 8 तास विज पुरवठा केला जातो. वीजमंडळाचे धोरणानुसार 24 तास वीजपुरवठा करणे आवश्यक आहे. वीज 8 तास दिली जाते तर वीजबिल 24 तासांचे आकारले जाते.
वीजवितरण कंपनीने (Power Distribution Company) शेतकर्यांना (farmers) न विचारता 3 एचपीचे कनेक्शन 5 एचपी त केल्याने बेकायदेशीरपणे वीज आकारणी केली जात आहे. वीजवितरण कंपनी म्हणते की अश्वशक्ती वार्षिक 1900 रु. प्रती तास वीज वापरली जाते हे खोटे आहे. शासनाने नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार प्रती अश्वशक्ती फक्त 1063 तासच विज वापरली जाते.
केंद्र व राज्य शासनाकडून शेती पंपाकरिता 72 टक्के अनुदान (Grants) दिले जाते. शासनाचे दिलेल्या अनुदानापोटी मिळणारी वीज पूर्ण शेतीला मिळत नाही. त्यामुळे वीजवितरण कंपनीकडेच शेतकर्यांचे येणे आहे. असे असूनही शेतीपंपाची वीज खंडित करणे चालू आहे. अजित पवार (ajit pawar) यांनी म्हटले होते की, आम्ही सत्तेत आल्यावर तीन महिन्यात सातबारा कोरा व वीजबिल मुक्ती करू.
तसेच शरद पवार (sharad pawar) यांनी सोसायटी व वीजबिल भरू नका असे सांगतिले होते. तसेच केंद्र सरकारच्या (central government) चुकीच्या आयात निर्यात (Import export) धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन तो आत्महत्या करत आहे. अतिवृष्टी (heavy rain) व अवकाळी पावसामुळे शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. दोन लाखावरील कर्जमुक्ती झालेली नाही. नियमित कर्ज फेड करणार्या शेतकर्यांना 50 हजार रु. मिळालेले नाही.
शेतीपंपाची विज खंडित करणे ताबडतोब थांबवावे अन्यथा शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष अर्जुन बोराडे, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शंकर पुरकर, तालुका अध्यक्ष रामकृष्ण बोंबले, भाऊसाहेब भंडारे, दगू गवारे, केदू बोराडे, संतू बोराडे, शिवराम ढिकले आदींच्या सह्या आहेत.
यावेळी अर्जुन बोराडे म्हणाले की, वीजवितरण कंपनीनेही शेतकरी हिताला प्राधान्य द्यावे. वीजभारनियमन करून व सक्तीची वीजवसुली करून शेतकर्यांचा अंत पाहू नये. अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने वीजवितरण कार्यालयाला देखील टाळे टोकून शेतकर्यांसमवेत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल. अशावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी वीजवितरण कार्यालयावर राहील असेही बोराडे यांनी म्हटले आहे.