करोना उपचारातील राजकीय ढवळाढवळ थांबवा

करोना उपचारातील राजकीय ढवळाढवळ थांबवा

आयएमएचे मुख्यमंत्र्यांना साकडे

नाशिक। Nashik

महाराष्ट्रातील कोरोना वाढीचा दर हा देशातील सरासरीत सर्वात आघाडीवर आहे. तर दुसर्‍या लाटेच्या तडाख्याने राज्यातील सर्व डॉक्टर चिंतेत आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी सर्व डॉक्टर शासना सोबत आहेत.

परंतु शासनानेही डॉक्टरांच्या व्यावसायिक स्वायत्ता जपण्याची गरज असून कोरोना उपचाराबाबात शासकीय तसेच राजकीय ढवळाढवळ वेळीच थांबणे आवश्यक असून याबाबत लवकर निर्णय घेण्याचे साकडे आयएमए ने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातले आहे.

याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. यात म्हटले आहे की, राज्यात कारोना रूग्णांना बेड, ऑक्सीजन, पुरेशी औषधे मिळत नाहीत. मृत्युचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

याबाबत सर्व डॉक्टरांना चिंता वाटत आहे. या संकटात, चिंताजनक परिस्थितीत शासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. राज्यभरात सर्वच डॉक्टरांनी स्वत तसेच कुटुंबियांचे जीव धोक्यात घालून सेवा दिली आहे. कोवीड योद्धे म्हणुन गौरव करण्यापेक्षा डॉक्टर प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरीकांकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा करत आहेत.

एकाच आजारात रूग्णांच्या क्षमतेनुसार रूग्ण एकाच औषधाला वेगवेगळा प्रतिसाद देतात. यामुळे त्यावर डॉक्टरांना अनुभवानुसार वेगळ्या पद्धतीने उपचार करावे लागतात. परंतु प्रशासनातील अधिकारी, नेते यांनी रोगाच्या उपचाराबाबत बेजबाबदार विधाने करणे टाळावे,

यंत्रणेवर मोठा ताण असला तरी एकमेकांच्या अधिकार आणि स्वायत्ततेचा आदर केला पाहिजे तसेच कमीत कमी प्रशासनाची ढवळाढवळ अपेक्षीत आहे. तसेच शासनाने राज्यातील सर्वच डॉक्टरांना विमार संरक्षण देण्याबाबत स्पष्ट निर्देश द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com