नाशिक कृउबात शेतकर्‍यांची लूट थांबवा: केदार

कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रतिनिधीक छायाचित्र
कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रतिनिधीक छायाचित्र

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

केंद्रातल्या नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारने शेतमालाचे लिलाव (Auction of farm produce) पारदर्शकपणे (transparent) व्हावे म्हणून इ-नाम योजना सुरू केली आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने (Nashik Agricultural Produce Market Committee) इ-नाम योजना (E-NAM Scheme) अद्याप सुरू केली नाही, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत राजरोसपणे शेतकर्‍यांची लूट होत आहे.

बाजार समितीच्या नियमानुसार शेतकर्‍यांना सुविधा न देता वेगवेगळ्या प्रकारे शेतकर्‍यांकडून (farmers) पैसे वसूल केले जातात. या बाजार समितीत अद्यापही शेतकर्‍यांच्या शेतमालाचे लिलाव पारदर्शकपणे होत नाहीत. शेतकर्‍यांची होत असलेली लूट थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन (agitation) केले जाईल तसेच पेठरोड (peth road) व दिंडोरी रोड (dindori road) या दोन्ही बाजार समितीच्या बाहेर रस्त्यांवर प्रति बाजार समिती सुरू करून शेतकर्‍यांचा शेतमाल रस्त्यांवर विकला जाईल, असा इशारा भाजप सरचिटणीस व कादवा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील केदार (Director of Kadwa Cooperative Sugar Factory Sunil Kedar) यांनी पत्रकान्वये दिला आहे.

केदार यांनी म्हटले आहे की, या बाजार समितीत काही ठराविक व्यक्ती हे गुंड व दादागिरी करणारे असून ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शेतकर्‍यांची लूट, छळवणूक व दादागिरी करतात. असाच गैरव्यवहार जागाभाडे व प्रवेश फी वसुलीच्या नावाने सुरू असून हा शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे. नाशिक महानगरपालिकेने नुकतेच या बाजार समितीचे 178 गाळे बेकायदेशीर असल्याची नोटीस दिली आहे.

अशाच प्रकारे अनेक कामे बेकायदेशीर झालेले सरकारी लेखा परीक्षण अहवालात नमूद आहे. या बाजार समितीला शिस्त लागावी व शेतकर्‍यांची होत असलेली लूट थांबावी अन्यथा तिव्र आंदोलन केले जाईल. या बाजार समितीत ज्या शेतकर्‍यांची लूट होत असेल, कोणी दादागिरी व धमक्या देत असेल तर शेतकर्‍यांनी भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संपर्क साधावा, असे आवाहन भाजप सरचिटणीस सुनील केदार यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com